सोने गहाण ठेवू नका, कर्जाचं काही खरं नाही!

आंतरराष्ट्रीय आणि स्वदेशी मार्केटमध्ये सोने किमतीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. सोन्याचा घसरता दर कर्जासाठी मारक ठरला आहे. बॅंकेने सोन्यावर कमी कर्ज देण्याची योजना आखली आहे. त्यामुळे सोन्याची किंमत घटल्याचे दिसत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 28, 2013, 09:50 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय आणि स्वदेशी मार्केटमध्ये सोने किमतीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. सोन्याचा घसरता दर कर्जासाठी मारक ठरला आहे. बॅंकेने सोन्यावर कमी कर्ज देण्याची योजना आखली आहे. त्यामुळे सोन्याची किंमत घटल्याचे दिसत आहे.
सोने किमतीत घट होत असल्याने बॅंकांनी सावध पवित्रा घेतला आहे. सोने कर्ज जास्तीत जास्त न देता ते कमी करण्यावर बॅंकांचा भर दिसून येत आहे. बॅंकांनी ठरविले आहे की, कर्जाच्या शेकड्याची टक्केवारी कमी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता सोन्यावर कमी टक्के कर्ज मिळणार आहे.
कर्जाचे मूल्य ठरवताना सोन्याची किंमत विचारात घेतली जाणार आहे. सध्या सोने दरात घट होत असल्याने बॅंकानी तसा निर्णय घेतलाय. स्टेट बॅंक ऑप इंडियासह अन्य बॅंकानी सोन्यावर ५० ते ६० टक्के कर्ज देण्याचे धोरण स्वीकारले आहे. असे असले तरी काही बॅंका ७० ते ८० टक्के कर्ज सोन्यावर देत आहेत.

सोने कर्ज देण्यामागे बॅंक व्यवसाय आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजापपेठेत सोन्याची किंमत कमी झाल्याने जास्त लोन देणे बॅंकांना देणे शक्य नाही. कारण सतत सोने किमतीत चढ-उतार दिसून येत आहे. सोन्याच्या माध्यमातून बॅंका गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत होत्या. आता सोने किंमत कमी होत असल्याने अशा गुंतवणुकीत धोका असल्याने बॅंका अधिकची रिस्क घेत नाही. त्यामुळे सोने कर्ज फायद्याचे नसल्याचे काही बॅंक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.