पाकिस्तानी बँकांच्या शाखा उघडणार भारतात!

पाकिस्तानातील राष्ट्रीय बँकांपैकी दोन बँकांना भारतात आपल्या शाखा उघडण्याची परवानगी मिळाली आहे. पाकिस्तानला भारतात गुंतवणूक करण्याची परवानगी मिळाल्यानंतर या बँकांना परवानगी मिळाली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 29, 2013, 07:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पाकिस्तानातील राष्ट्रीय बँकांपैकी दोन बँकांना भारतात आपल्या शाखा उघडण्याची परवानगी मिळाली आहे. पाकिस्तानला भारतात गुंतवणूक करण्याची परवानगी मिळाल्यानंतर या बँकांना परवानगी मिळाली आहे. या परवानगीमुळे दोन्ही देशातील व्यापारी संबंधी सुधारतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर यासिन अन्वर म्हणाले की नॅशनल बँक ऑफ पाकिस्तान आणि युनायटेड बँक लिमिटेडला भारातात आपली शाखा स्थापन करण्याची परवानगी मिळाली आहे. भारताने पाकिस्तानला संरक्षण, अणु संशोधन आणि अंतराळ संशोधन ही क्षेत्रं सोडून इतर सर्व क्षेत्रांत गुंतवणुकीला परवानगी दिली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेला स्टे बँक ऑफ पाकिस्तानद्वारे पाकिस्तानी बँकांच्या भारतातील व्यवहारांच्या मंजुरी प्रकरणी सूचना मिळतील. पाकिस्तानी बँकांना भारतात शाखा उघडण्यासाठी मिळालेल्या परवानगीवरून यापूर्वी टीका झाली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.