फुटिरतावादी नेत्यांना दहशतवाद्यांकडून आर्थिक मदत ?
पाकिस्तानातल्या अतिरेकी संघटनांकडून काश्मीरमधल्या फुटिरतावादी नेत्यांना आर्थिक मदत मिळत असल्याचा आरोप झाल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेनं या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. फुटिरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांची चौकशी करण्यासाठी NIAचं पथक काश्मीरमध्ये पोहोचलं आहे.
May 20, 2017, 08:55 AM ISTकाश्मीरमधल्या फुटिरतावादी नेत्यांवर होणार कठोर कारवाई
जम्मू-काश्मीरमधल्या फुटिरतावादी नेत्यांवर कठोर कारवाई करण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या नेत्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि त्यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात कपात होऊ शकते. याबाबत पंतप्रधान कार्यालयानं गृह मंत्रालयाला निर्देश दिले आहेत.
Sep 7, 2016, 09:36 AM IST