पुणे महापालिका

पुणे पालिकेत खाबुगिरीचा प्रकार, नगरसेविकेच्या पतीची ठेकेदाराला धमकी

महापालिकेतील खाबुगिरीचा धक्कादायक नमुना पुण्यात समोर आलाय. टेंडरची रिंग तोडली म्हणून एका नगरसेविकेच्या पतीने ठेकेदाराला थेट धमकी दिली आहे. त्याची ऑडिओ क्लिप सध्या पुण्यात व्हायरल झालीय. 

Nov 25, 2017, 04:58 PM IST

पुणे महापालिकेच्या सत्तेत भाजपचे ६ महिने पूर्ण

पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता येऊन सहा महिने होत आहेत. सहा महिन्यातच भाजपला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला अशी टीका विरोधकांनी केली आहे.

Sep 18, 2017, 09:01 PM IST

पुणे पालिकेत ५०० कोटींचा घोटाळा, संजय काकडेंचा भाजपला घराचा आहेर

महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेचा प्रचंड गाजावाजा झाला. त्यासाठी महापालिकेनं कर्जरोखे उभारले. पण, या कामाच्या १७०० कोटींच्या निविदांमध्ये तब्ब्ल ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. त्याला भाजप खासदार संजय काकडे यांनी देखील साथ दिलीय. त्यामुळं भाजपाला घराचा आहेर मिळालाय. 

Aug 1, 2017, 09:22 AM IST

११च नको, सर्व ३४ गावं महापालिकेत घ्या!

पुण्याला लागून असलेली गावं महापालिकेत समाविष्ट करण्याच्या निर्णयाचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण उमटले आहेत. महापालिका हद्दीलगतची केवळ अकरा गावं महापालिकेत घेण्याऐवजी सर्वच्या सर्व म्हणजे ३४ गावं महापालिकेत घेण्याची मागणी विरोधकांनी केलीय. त्याचप्रमाणे गावांच्या समावेशामुळे महापालिकेला जीएसटीपोटी मिळणारं अनुदान वाढवून देण्याची मागणी देखील विरोधकांनी केलीय

Jul 21, 2017, 06:15 PM IST

पुणे महापालिकेत नवीन गावांना समाविष्ट करण्याचा मिळाला मुहूर्त

शहराच्या हद्दीलगतची गावं पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला अखेर मुहूर्त मिळाला. मात्र हे या लढ्याला मिळालेलं अर्धवट स्वरूपाचं यश आहे. 

Jul 20, 2017, 10:37 PM IST

पुण्याच्या महापौरांनाही 'तुकाराम मुंढें'सारखे अधिकारी 'नकोसे'

पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी पुण्याचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना शासनाच्या परत बोलावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्याचा निर्णय घेतला आहे.

Jun 29, 2017, 09:52 AM IST

बॉन्ड्स घ्या बॉन्ड्स पुणे महापालिकेचे बॉन्ड्स...

विकासकामं मार्गी लावण्यासाठी पुणे महापालिकेन एक पाऊल पुढं टाकलं आहे. विकासकामांना निधी उभारण्यासाठी महापालिका म्युनिसिपल बॉण्ड्स भांडवल बाजारात आणणार आहे. म्युनिसिपल बॉण्ड्स मधून पुणे महापालिका बाविशे कोटी रुपये उभारणार आहे. त्यामुळं, बाँड्सच्या विक्रीतून निधी उभारणारी पुणे देशातील पहिली महापालिका ठरणार आहे. 

Jun 22, 2017, 06:17 PM IST

शेअर मार्केटला पुणे महापालिकेचे बॉण्ड लिस्टिंग

भारतीय शेअर बाजाराच्या इतिहास पहिल्यांदाच एखाद्या महापालिकेचे कर्जरोखे खरेदी विक्रीसाठी खुले झाले आहेत.

Jun 22, 2017, 02:20 PM IST

पुणे महापालिका कर्जरोख्यांवर गुंतवणूकदारांच्या उड्या

२४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी पुणे महापालिकेने बाजारात आणलेल्या बॉण्ड अर्थात कर्जरोख्यांवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या आहेत. शेअर बाजारात सोमवारी लावण्यात आलेल्या ऑनलाईन बोलीमध्ये या कर्जरोख्यांना २१ गुंतवणूकदारांनी मागणी नोंदवली.

Jun 20, 2017, 04:49 PM IST

'पुणे पालिकेचे ५.९१२ कोटींचे अंदाजपत्रक, बजेटमध्ये दुजाभाव'

महापालिकेचं चालू आर्थिक वर्षासाठी तब्बल ५ हजार ९१२ कोटी रुपयांचं अंदाजपत्रक आहे. पण, विरोधक मात्र यावर समाधानी नाहीत. या बजेटमध्ये दुजाभाव झाल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला आहे.

May 19, 2017, 12:26 PM IST

पुण्याचे उपमहापौर कांबळे यांचे निधन

पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने झाले निधन.

May 16, 2017, 10:10 AM IST