पुणे : भारतीय शेअर बाजाराच्या इतिहास पहिल्यांदाच एखाद्या महापालिकेचे कर्जरोखे खरेदी विक्रीसाठी खुले झाले आहेत. पुणे महापालिकेनं 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी पुणे महापालिकेनं बाजारात आणलेल्या बॉण्डचं लिस्टिंग मुंबई शेअर बाजारात करण्यात आलं.
दोन दिवसांपूर्वी हे बॉन्ड खुले करण्यात आले. त्यावेळी पहिल्याच फटक्यात पुणे महापालिकेला दोनशे कोटींचा निधी मिळाला. केंद्रीय मंत्री वेंकया नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. पुणे महापालिकेसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरलाय.