पाकिस्तानी शाळेत बंदूक चालवण्याच दिलं जातय प्रशिक्षण
ज्या हातांमध्ये पेन असलं पाहिजे त्या हातांमध्ये दिसतायत बंदुका. शिक्षणाच्या मंदिरातील शिक्षकरुपी देवाला उठाव्या लागतायत बंदुका. तेथे ए फॉर एके४७ असं शिकलवलं जातय. हे चित्र आहे पाकिस्तानातील शाळेतलं. नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार पाकिस्तानातील शाळांमध्ये बंदूक कशी चालवायची याचे प्रशिक्षण मुलांना दिले जातेय. अशा प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यी स्वसंरक्षण करु शकतील आणि दहशतवादाशी दोन हात करु शकतील असा दावा येथील शिक्षकांनी केलाय.
Feb 1, 2016, 05:00 PM IST