अजित पवार संतापलेत, 'पूर्वी नोटबंदी झाली त्यावेळी लोकांनी खूप काही सहन केलं...'
Ajit Pawar on Note Ban : पुन्हा एकदा नोट बंदी होत आहे. मात्र, महागाईवर कोणीही बोलत नाही. पूर्वी नोटा बंद झाल्या त्यावेळी लोकांनी खूप काही सहन केले. या नोटबंदीमधून काळा पैसा बाहेर येईल आणि डुप्लिकेट नोटांना आळा बसेल, असे सर्वसामान्यांना वाटलं होते.पण तसं काही झालेले नाही, असे अजितदादा म्हणाले.
May 20, 2023, 02:21 PM IST२००० रुपयांची नोट बंद होणार आहे का? मोदी सरकारने दिले हे उत्तर
२०१६ मध्ये नोटबंदी लागू करण्यात आल्यानंतर २००० रुपयांची नोट चलनात आली. त्यानंतर ही नोट बंद करण्याच्या विचारात मोदी सरकार असल्याचे वृत्त होते. याबाबत आज लोकसभेत २००० नोट बंद होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आलेय. तसेच अशी काही योजना नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.
Mar 16, 2018, 10:23 PM ISTमोदी सरकारवर यशवंत सिन्हांचा हल्लाबोल, अर्थव्यवस्था डबघाईला
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर भाजप नेते आणि अटलबिहारी वाजपेयी सरकारमधील मंत्री यशवंत सिन्हा यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
Sep 27, 2017, 11:01 AM ISTमोदींनी दुसऱ्यांचे ऐकले असते तर अनेक समस्या सुटल्या असत्या - राहुल गांधी
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. नोटबंदी आणि जीएसटी लागू करण्याबाबत मोदी सरकारने कोणाचे ऐकूण न घेता निर्णय घेतला. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात आलेय. मात्र, मोदींनी दुसऱ्याचे ऐकले असते तर ही वेळ आली नसती, अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.
Sep 27, 2017, 10:46 AM ISTनोटबंदीनंदर केंद्रीय कर्मचारी सरकारच्या रडारवर
केंद्र सरकारने नोटबंदीचा निर्णय अचानकपणे जाहीर केला आणि देशभरात कल्लोळ सुरू झाला. आता सरकार पुन्हा एकदा नव्या तयारीत असून, यावेळी केंद्रीय कर्मचारी सरकारच्या रडारवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
Sep 17, 2017, 05:27 PM ISTअर्थव्यवस्थेला धोक्याचा इशारा: देशातील घाऊक महागाईत दुपटीने वाढली
सत्तेवर आल्यावर घेतलेल्या आर्थिक निर्णयांबाबत केंद्र सरकार मोठमोठे दावे करत आहे. परंतु, वास्तवातील चित्र मात्र काहीसे वेगळेच आहे. देशातील घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) अधारीत महागाई दर ऑगस्ट महिन्यात दुपटीने वाढला असून, तो ३.३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेसाठी हा धोक्याचा इशारा समजला जात आहे.
Sep 14, 2017, 04:14 PM ISTभारतीय चलनात पुन्हा १००० ची नवी नोट येणार
येत्या डिसेबरच्या अखेरील एक हजाराची नोट नव्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह परत एकदा चलनात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलीय. 'झी मीडिया'चे सहकारी वृत्तपत्र 'डीएनए'ने दिलेल्या वृत्तानुसार नव्या एक हजाराच्या नोटेसाठी सध्या डिझाईन तयार करण्याचं काम सुरू आहे.
Aug 28, 2017, 12:20 PM ISTनोटबंदीचे ऑपरेशन यशस्वी पेशंट डेड - शरद पवार
देशात काळा पैशाची समस्या होती, काळा पैसा चलनातून हद्दपार व्हायला हवा अशी भूमिका सर्वांची होती, पण त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नसल्याने ऑपरेशन यशस्वी पण पेशंट डेड अशी अवस्था झाल्याची उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली.
Jan 12, 2017, 09:15 PM ISTबँकेसमोर म्हशी बांधून नोटबंदी विरोधात आंदोलन
कोल्हापुरात आज नोटाबंदीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं अनोखं आंदोलन केलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी या आंदोलनामधे बँक ऑफ इंडियाच्या समोर म्हशींना बांधून सरकारचा निषेध केला.
Jan 9, 2017, 05:50 PM ISTआतापर्यंत किती जमा झाल्या ५०० रुपयांच्या नोटा
काळ्या पैशावरील सर्जिकल स्ट्राईकनंतर रिझर्व्ह बँकेकडे 30 डिसेंबरपर्यंत तब्बल 14.97 लाख कोटी रुपये 500 आणि हजाराच्या नोटांच्या स्वरुपात जमा झालेत.
Jan 5, 2017, 05:50 PM ISTनोटाबंदीचा निर्णय फसल्यास संपूर्ण जबाबदारी माझी - मोदी
नोटाबंदीचा जाहीर करण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना या निर्णयानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची कल्पना होती.
Dec 9, 2016, 06:30 PM ISTनोटबंदीबाबत मोदींना मागावी माफी...
नोटाबंदीच्या निर्णयावरून संसदेत सलग सोळाव्या दिवशी गोंधळाचं वातावरण आहे. विरोधक आणि सत्ताधा-यांच्या गोंधळामुळं दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी केली.
Dec 7, 2016, 11:52 PM ISTटोल कंत्राटदारांकडून नुकसान भरपाईची मागणी
राज्यात गेल्या २४ दिवसांपासून लागू करण्यात आलेल्या टोल माफीमुळे टोल कंत्राटदारांनी त्यांना झालेल्या नुकसान भरपाईची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
Dec 2, 2016, 04:50 PM ISTनोटाबंदीनंतर पॅनकार्ड नियमांत बदल
देशातील काळ्यापैशावर लगाम लावण्यासाठी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर लोकांनी काळापैसा लपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. तसेच बॅंकांमध्ये देखील मोठ्याप्रमाणावर पैशाची देवाण घेवाण सुरू झाली.
Nov 27, 2016, 10:40 PM ISTनोटबंदीचा सर्वाधिक त्रास मुस्लिमांना - कपिल सिब्बल
देशभरात सध्या नोटबंदीचा निर्णय चांगलाच चर्चेत आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेता कपिल सिब्बल यांनी नोटबंदीच्या निर्णयाला मुस्लिमांशी जोडलं आहे. मोदी सरकारच्या नोटबंदी निर्णयाचा सर्वात जास्त त्रास हा मुस्लिमांना होत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
Nov 27, 2016, 07:46 PM IST