नोटाबंदीनंतर पॅनकार्ड नियमांत बदल

देशातील काळ्यापैशावर लगाम लावण्यासाठी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर लोकांनी काळापैसा लपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. तसेच बॅंकांमध्ये देखील मोठ्याप्रमाणावर पैशाची देवाण घेवाण सुरू झाली.

Updated: Nov 27, 2016, 10:40 PM IST
 नोटाबंदीनंतर पॅनकार्ड नियमांत बदल title=

नवी दिल्ली : देशातील काळ्यापैशावर लगाम लावण्यासाठी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर लोकांनी काळापैसा लपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. तसेच बॅंकांमध्ये देखील मोठ्याप्रमाणावर पैशाची देवाण घेवाण सुरू झाली.
 
 सरकारने या नोटाबंदीच्या निर्णयानंतर PAN CARD नियमांमध्ये देखील बदल केले आहेत. नोटाबंदीनंतर आयकर विभागाची बॅंकांमध्ये पैसा जमा करणाऱ्यावर करडी नजर आहे. 
 
  अवैध्य मार्गाने काळापैसा बॅंकांपर्यंत पोहचू नये यासाठी आयकर विभागाच्या नियमाअंतर्गत तरतूद केलेल्या 14 बी मध्ये अनेक बदल करण्यात आले. नवीन नियमानुसार आता 50 अथवा 25 लाखांवर ठेवी ठेवणाऱ्यावर सरकारचे लक्ष असणार आहे. 
   
  आपण बॅंक खात्यात 25 लाखावरती रक्कम सतत भरत अथवा काढत असल्यास बॅंकेने त्याची माहिती आयकर विभागाला दिल्यास आपल्याला पॅनकार्ड दाखवणे अनिवार्य असणार आहे.
  
  ज्या लोकांनी आपले बॅंक खाते पॅनकार्डने जोडले नाहीत. त्यांना 50 हजाराच्यावर रक्कम जमा करण्यासाठी पॅनकार्ड दाखवणे बंधनकारक असणार आहे. पॅनकार्ड नसल्यास पैसा जमा करता येणार नाही. 
  
  कोणत्याही बॅंक अथवा को- ऑपरेटीव्ह बॅंकेतून एका दिवसात 50 हजाराच्यावर ड्रॉफ्ट विकत घेताना अथवा कोणत्याही बॅंकेत  खाते उघडण्यासाठी पॅनकार्ड दाखवणे गरजेचे असणार आहे.
   
  पूर्वी लोक एका नावाने अनेक बॅंक खाती खोलत होती आणि प्रत्येक खात्यातून वेगवेगळ्या मार्गांनी पैशाची देवाण घेवाण करत होती, परंतु आता सरकार पैशाच्या देवाणघेवाणीवर करडी नजर ठेवणार आहे. 
  
  ऑनलाईन पॅनकार्ड अप्लाय करण्यासाठी आपण एनएसडीएलचे पोर्टल www.tin-nsdl.com वर जाऊन services ऑप्शनवर क्लिक करून अप्लाय ऑनलाईन ऑप्शनमध्ये जाऊन न्यू पॅन वर क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरू शकता. 
  किंवा आयकर विभागाच्या www.incometaxindia.gov.in या वेबसाईटवर जाऊन PAN ऑप्शनवर क्लिक करून एनएसडीएल किंवा 
 UTIITSL च्या माध्यामातून फॉर्म भरू शकता आणि वेबसाईटवरूनच ऑनलाईन पेमेंट करू शकता. त्यानंतर भरलेल्या फॉर्मची प्रिंटआऊट काढून त्यावर आपला फोटो आणि सही करावी.  
  तसेच फॉर्मसोबत आवश्यक ती कागदपत्र लावून पोस्टामार्फत 
 NSDL/UTIITSL वर पाठवा.