बँकेसमोर म्हशी बांधून नोटबंदी विरोधात आंदोलन

कोल्हापुरात आज नोटाबंदीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं अनोखं आंदोलन केलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी या आंदोलनामधे बँक ऑफ इंडियाच्या समोर म्हशींना बांधून सरकारचा निषेध केला. 

Updated: Jan 9, 2017, 05:50 PM IST
 बँकेसमोर म्हशी बांधून नोटबंदी विरोधात आंदोलन  title=

कोल्हापूर : कोल्हापुरात आज नोटाबंदीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं अनोखं आंदोलन केलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी या आंदोलनामधे बँक ऑफ इंडियाच्या समोर म्हशींना बांधून सरकारचा निषेध केला. 

यावेळी आंदोलकांनी बँकेसमोर आणलेल्या म्हशी बँकेमध्ये घुसवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवून आंदोलकांना रोखलं. त्यामुळं पोलिस आणि आंदोलक यांच्यामध्ये झोंबाझोंबी झाली. 

जर नागरिकांना पैसा सुरळीत मिळाला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला. पोलिसांनी जनावरांना हकलून दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं.