नितीशकुमार

नितीशकुमार यांना न्यायालयाचा झटका, निवड अवैध

बिहारमध्ये राजकीय भूकंप होत आहेत. मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आल्यानंतर नितीशकुमार यांची बिहारमधील जनता दल युनायटेड पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी करण्यात आली. मात्र, या ही निवड अवैध असल्याचे पाटणा उच्च न्यायालयाने म्हटलेय. त्यामुळे नितीशकुमार यांना हा मोठा झटका आहे.

Feb 11, 2015, 06:39 PM IST

बिहार विधानसभा बरखास्तीच्या प्रस्तावाला विरोध, पेच कायम

बिहार राज्यात राजकीय घडामोडींनी चांगलाच वेग घेतलाय. विधानसभा बरखास्त करण्याच्या प्रस्तावावरुन, मुख्यमंत्री जीतनराम मांझी विरुद्ध जेडीयूचे नितीशकुमार अशी उभी फूट पडली आहे.  

Feb 7, 2015, 05:32 PM IST

बिहारमध्ये राजकीय पेच, नितीशकुमारांना मुख्यमंत्र्यांचा शह

बिहारमध्ये राजकीय पेच वाढत असल्याचं चित्र आहे. नितीश कुमार यांच्यासाठी सिंहासन रिकामं करण्यास मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी नकार दिलाय. २० तारखेला मांझी यांनी संसदीय पक्षाची बैठक बोलावली आहे. 

Feb 6, 2015, 07:34 PM IST

वाद ‘भारतरत्न’चा: नितीशकुमारांनंतर केंद्रीय मंत्री पल्लम राजू मैदानात

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देशातील सर्वोच्च नागरिक सन्मान ‘भारतरत्न’ दिला गेल्या नंतर आता या मुद्द्यावर राजकारण रंगू लागलंय. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केली. नितीशकुमारांनी वाजपेयींसोबतच बिहारचे नेता कर्पूरी ठाकुर यांनाही ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केलीय.

Nov 18, 2013, 04:00 PM IST

पंतप्रधानपदासाठी नितीशकुमारांनी केला विश्वासघात-मोदी

पंतप्रधानपदासाठी नितीशकुमारांनी केला विश्वासघात-मोदी

Oct 27, 2013, 02:09 PM IST

निवडणूक सभांचा आज सुपर संडे!

५ राज्यातील निवडणुकांची धामधूम सुरु झालीय. त्याच पार्श्वभूमीवर आज निवडणूक सभांचा सुपर संडे रंगणार आहे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी सामना पाहायला मिळणार आहे.

Oct 27, 2013, 11:29 AM IST

नितीशकुमारांच्या बिहारमध्ये आज मोदींचा ‘हुंकार’!

पंतप्रधान पदासाठी मोदींना कडाडून विरोध करणाऱ्या नितिशकुमारांच्या आखाड्यात अर्थात बिहारमध्ये आज नरेंद्र मोदींची जाहिर सभा होतीये. त्यामुळं मोदींच्या आजच्या हुंकार रॅलीतील भाषणाकडे आणि मोदी नितिशकुमारांवर काय बोलतात याकडे साऱ्या देशाचं लक्ष्य लागलंय.

Oct 27, 2013, 08:28 AM IST

स्फोटाचं राजकारण : मोदींवर निशाणा

बिहारमधल्या बोधगयामध्ये झालेल्या स्फोटाचं राजकारण सुरु झालंय. नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केलेल्या भाषणात नितीशकुमारांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असं आवाहन केलं होतं...

Jul 8, 2013, 02:49 PM IST

बिहारमध्ये नितीशकुमारांना काँग्रेसने तारले

बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा पाठिंबा काढून घेतला खरा. मात्र, आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनात काँग्रेसने साथ दिल्याने नितीशकुमार यांनी सहज विश्वासदर्शक ठराव जिंकला.

Jun 19, 2013, 10:00 PM IST

भाजपनं विश्वासघात केला - नितीशकुमार

भाजपला वाजपेयी आणि अडवाणींचा विसर पडल्याचा टोला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लगावलाय. तसंच भाजपनं विश्वासघात केल्याचा आरोप नितीश कुमार यांनी केलाय.

Jun 17, 2013, 03:30 PM IST

मोदींनिवडीनंतर एनडीएत आघाडीची बिघाडी

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींकडे निवडणूक प्रचाराची सूत्र आल्यामुळे भाजपचा मित्रपक्ष जेडीयू नाराज आहे. तसेच भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राजीनामा देऊन नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे एनडीएशी संबंध तोडण्याची तयारी मुख्यमंत्री नितीश कुमारांनी चालवल्याची सूत्रांची माहिती आहे.

Jun 12, 2013, 03:12 PM IST