नितिन गडकरी

राणेंनी भाषणात उद्धव, रश्मी ठाकरे यांचे नाव घेतले!

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण भूमीपूजनाचा कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे एकाच मंचावर आले. नारायण राणेंनी भाषणाला सुरूवात करताच राणे समर्थकांनी घोषणाबाजी केली. तर भाषणात उद्धव आणि रश्मी ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करताच शिवसैनिकांनीही जोरदार घोषणाबाजी केली.  

Jun 23, 2017, 06:07 PM IST

गडकरींनी रश्मी ठाकरे यांना दिले मानाचे स्थान

कोकण विकासाला चालना देणाऱ्या मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाचा आज शुभारंभ होत आहे. या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सौभाग्यवती रश्मी ठाकरे यांना व्यासपीठावर मानाचे स्थान देण्यात आले. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन त्यांना व्यासपीठावर येणाची विनंती केली.

Jun 23, 2017, 05:23 PM IST

नितिन गडकरी यांनी सर्वात आधी हटवला 'लाल दिवा'

कामगार दिवसापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. केंद्रीय कॅबिनेट बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Apr 19, 2017, 03:48 PM IST

मरीन ड्राईव्हपेक्षा ३ पट मोठा मरीन ड्राईव्ह विकसित करणार

मुंबईतील पश्चिम किनारपट्टीप्रमाणे पूर्व किनारपट्टी विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.

Apr 17, 2017, 04:30 PM IST

गडकरींच्या उपस्थितीत राणेंच्या पासष्टीचा कार्यक्रम

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या पासष्टीच्या निमित्तानं आज मुंबईत एका विशेष अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Apr 9, 2017, 01:18 PM IST

युती गोड बोलून तोडायला हवी होती- नितिन गडकरी

शिवसेनेला युती तोडायची होती तर ती गोड बोलून तोडायला हवी होती, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे 25 वर्षे युतीत शिवसेना सडल्याचा आरोप चुकीचा आहे. युतीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला होता. तसंच दोन्ही पक्षांकडून होत असलेले आरोप-प्रत्यारोपही योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Jan 28, 2017, 12:35 PM IST

नितीन गडकरी आज मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेणार भेट

500, 1000 नोंटाबंदी निर्णयानंतर शिवसेनेची भाजपच्या धोरणावर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच सहकारी बॅंका आणि पतसंस्था यांच्यावर घातलेल्या निर्बंधाबाबतही शिवसेनेने भाजपवर हल्लाबोल चढवला होता. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आजच्या भेटीकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, गडकरी आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी जात असल्याचे सांगितले आहे.

Nov 22, 2016, 10:48 AM IST

प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याने ऐकावं असं गडकरींचं भाषण

पुणे : पुण्यात नितिन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आणखी एक सर्वोत्कृष्ट भाषण केलं. हे भाषण प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याने ऐकावं असं आहे. ऐका नितिन गडकरी यांनी सांगितलं कार्यकर्ता म्हणजे काय?

Jun 19, 2016, 09:06 PM IST

मुंबईत बुर्ज खलिफापेक्षाही मोठी इमारत उभारणार-गडकरी

केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांनी दुबईतील बुर्ज खलिफापेक्षाही मोठी इमारत मुंबईत उभारण्याची इच्छा व्यक्त केली आहे, या इमारतीला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Oct 31, 2015, 05:17 PM IST

कृपा करा, ज्या अधिकाऱ्यांना काम करायचं नसेल त्यांनी व्हीआरएस घ्या..!

कृपा करा, ज्या अधिकाऱ्यांना काम करायचं नसेल त्यांनी व्हीआरएस घ्या..!

Oct 2, 2015, 11:07 AM IST

कृपा करा, ज्या अधिकाऱ्यांना काम करायचं नसेल त्यांनी व्हीआरएस घ्या..!

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की, जर तुम्हाला कामं करायची नसतील, तर कृपया व्हीआरएस घ्या, पण सरकारच्या कामात अडथळा आणू नका.

Oct 1, 2015, 11:33 PM IST

टोल पूर्णपणे बंद होणं शक्य नाही - गडकरी

टोल पूर्णपणे बंद होऊ शकत नाही' असं सांगत नितीन गडकरी यांनी टोलमाफीच्या मुद्यावर घुमजाव केला आहे. एका न्यूज चॅनेलच्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.

May 21, 2015, 05:38 PM IST