नवी दिल्ली : टोल पूर्णपणे बंद होऊ शकत नाही' असं सांगत नितीन गडकरी यांनी टोलमाफीच्या मुद्यावर घुमजाव केला आहे. एका न्यूज चॅनेलच्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.
'जनतेला चांगले रस्त हवे असतील तर टोल राहणारच' असे सांगत टोल पूर्णपणे बंद होणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
याच गडकरींनी विधानसभा निवडणुक प्रचारादरम्यान 'आपण टोलचा खेळ सुरू केला होता आणि आता आपणच तो बंद करू' असे आश्वासन देत जनतेला गाजर दाखवलं होतं. मात्र सरकार सत्तेवर येऊन अवघे वर्ष पूर्ण होते न होते तोच त्यांनी आपल्या विधानावरून पलटी मारली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.