नगरपालिका निवडणूक

नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी सरासरी ७० टक्के मतदान

राज्यातील 25 जिल्ह्यांमधील 164 नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 147 थेट नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांसाठी आज सरासरी 70 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. 

Nov 27, 2016, 11:14 PM IST

नगरपालिका निवडणूक - अमळनेर शहर पेटलं

अमळनेर शहरात पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे. अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांनी केलेल्या मारहाणीत सर्वपक्षीय आघाडीचे नेते अनिल पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत.

Nov 27, 2016, 04:27 PM IST

राष्ट्रवादीचा काँग्रेसला इशारा, आम्ही वाट बघणार नाही!

मुंबई महापालिकेत आघाडीसाठी आम्ही काँग्रेसची वाट बघणार नाही. आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवण्यास तयार आहोत, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादीने काँग्रेसला दिला आहे.

Nov 17, 2016, 07:36 PM IST

महाबळेश्वर नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अटीतटीची लढत

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अटीतटीची लढत होणार आहे. महाबळेश्वर, महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जातं. सातारा जिल्ह्यातली महाबळेश्वर ही नगरपालिका सर्वात जुनी गिरिस्थान नगरपालिका असून इंग्रज काळापासून तिला महत्त्व आहे. 

Nov 8, 2016, 08:12 PM IST

जिंतूरमध्ये जोरदार चूरस, राष्ट्रवादीत बंडखोरीने तिरंगी लढत

नगरपालिका निवडणुकांचे पडघम जोरात वाजले असून परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या निवडणुका लागल्यात. परभणी जिल्ह्यातली महत्वाची नगरपालिका म्हणून जिंतूर नगरपालिकेकडे बघितले जाते. इथे आजी माजी आमदारांचा कट्टर संघर्ष बघायला मिळतो. मात्र यावेळेस राष्ट्रवादीतून बंडखोरीकरून दोघात तिसरा आल्याने तिरंगी लढत बघायला मिळणार आहे.

Nov 8, 2016, 07:05 PM IST

राज्यात युती मात्र रत्नागिरीत शिवसेना-भाजप आमनेसामने

राज्यात शिवसेनेची युती झालीय खरी पण रत्नागिरी नगरपरिषदेसाठी शिवसेना-भाजप आमनेसामने आहेत. शिवसेनेकडून उदय सामंतांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेना-भाजपसह राष्ट्रवादीनंही आपल्यालाच जनतेचा कौल मिळेल असा दावा केला असला तरी खरं चित्र 28 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल. 

Nov 8, 2016, 06:22 PM IST

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सधन उमेदवारांना सोन्याचा भाव!

सांगली - सातारा विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. निवडणुकीकरता धनशक्तीचा वापर आणि घोडेबाजार मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप केला जातोय. 

Nov 3, 2016, 08:13 PM IST

रत्नागिरीत भाजप राष्ट्रवादीला मोठा धक्का देणार?

रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्ष शिगेला पोहोचलाय. नाराज असलेल्या भास्कर जाधवांनी आपल्या संतापाला मोकळी वाट करून दिलीय तर रमेश कदम यांनी जाधवांवर तोफ डागलीय. दुसरीकडे दोघांच्या भांडणात राजकीय लोणी खाण्यासाठी भाजपा टपून बसल्याचीही चर्चा आहे. 

Oct 27, 2016, 09:11 PM IST

अकोल्यात बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर अपक्षांना भाव चढणार?

अकोला जिल्ह्यात पाच नगरपालिकांमध्ये निवडणुकीचा ज्वर चढायला सुरुवात झालीय.

Oct 26, 2016, 09:25 PM IST

रत्नागिरीत शिवसेनेचे 15 उमेदवार तर राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर

 रत्नागिरी नगर परिषदेसाठी शिवसेनेने आपली 15 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, नगराध्यपदाचा उमेदावर जाहीर केलेला नाही. तर राष्ट्रवादीने उमेश शेट्ये यांना थेट नगराध्यपक्षासाठी उमेदवार जाहीर केलेय.

Oct 26, 2016, 08:56 AM IST

निलंग्याचे नागरिक आजोबा-नातवातल्या युद्धाला कंटाळले?

जिल्ह्यातल्या चार नगरपालिकांपैकी निलंगा नगरपालिकेचा रणसंग्राम चांगलाच रंगणार अशी चिन्ह आहेत. 

Oct 25, 2016, 07:54 PM IST

लातूरवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा वरचष्मा कायम राहणार?

जिल्ह्यातल्या 4 नगरपालिकांच्या निवडणुका येत्या 14 डिसेंबरला होत आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी कंबर कसलीय.

Oct 25, 2016, 07:42 PM IST