देवेंद्र फडणवीस

शेट्टी प्रकरणातील CBI क्लोजर रिपोर्टवर अण्णांची टीका

शेट्टी प्रकरणातील CBI क्लोजर रिपोर्टवर अण्णांची टीका

Aug 12, 2014, 09:34 AM IST

राणेंसाठी भाजप नेते अनुकूल?

नारायण राणेंच्या प्रवेशाबाबत कोकणातले भाजप नेते अनुकूल असल्याची चर्चा आहे. आमची भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठींच्या कानी घातली आहे. राणेंबाबत पक्षाचं नेतृत्व निर्णय घेईल, असं विधान भाजपचे कोकण प्रभारी विनय नातू यांनी केलंय.

Jul 21, 2014, 06:15 PM IST

'महायुती म्हणूनच लढणार' फडणवीस यांचा खुलासा

शिवसेनेसोबत युती नको अशी भावना अनेक पदाधिका-यांनी या बैठकीत व्यक्त केली. मात्र प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी महायुती म्हणूनच लढणार असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी सर्व २८८ मतदारसंघांमध्ये काम करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

Jul 3, 2014, 07:38 PM IST

गडकरींच्या नेतृत्वाखाली राज्यातील निवडणुका

नितीन गडकरींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या निवडणुका लढल्या जाण्याची शक्यताय...भाजप कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये लावण्यात आलेल्या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या नंतर गडकरी यांचे छायाचित्र लावण्यात आलंय.

Jul 3, 2014, 07:19 PM IST

शिवसेनेबरोबर युती तोडा, भाजपमध्ये मागणी

भाजपमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याची मागणी पुढे आली आहे. मुंबईत सुरू असलेल्या कार्यकारिणी बैठकीत याबाबत जोरदार सूर उमटलाय. भाजपचे नेते मधू चव्हाण यांनी थेट भाषणातच हा मुद्दा छेडलाय... 

Jul 3, 2014, 06:54 PM IST

महायुतीतील नेत्यांशी चर्चा करुनच मुख्यमंत्री ठरणार - उद्धव

शिवसेनेचा आज वर्धापन दिन कार्य़क्रम झाला. यानिमित्त दोन दिवसीय शिबीराचं आयोजन केलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन शिबीरामध्ये मांडलेलं व्हिजन सांगितलं. महायुतीचं सरकार आल्यावर मुंबईसाठी काय करणार याबद्दल उद्धव ठाकरेंनी माहिती दिली.

Jun 19, 2014, 08:03 PM IST

मुख्यमंत्री कोणाचा? शिवसेना-भाजपात एकवाक्यता नाही

मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेनं आज अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलाय. उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असं शिवसेनेनं स्पष्ट केलंय. त्यामुळं भाजपची चांगलीच कोंडी झाली असून, मुख्यमंत्रीबाबत महायुतीच्या बैठकीत निर्णय घेऊ, अशी सावध भूमिका तूर्तास भाजपनं घेतलीय.

Jun 19, 2014, 06:27 PM IST

पंकजा मुंडे भाजपच्या कोअर कमिटीत येणार- फडणवीस

मुंबईत भाजपच्या राज्यातल्या कोअर कमिटीची बैठक झाली. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक पार पडली. पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांनी सांगितलंय.

Jun 19, 2014, 05:55 PM IST