राणेंसाठी भाजप नेते अनुकूल?

नारायण राणेंच्या प्रवेशाबाबत कोकणातले भाजप नेते अनुकूल असल्याची चर्चा आहे. आमची भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठींच्या कानी घातली आहे. राणेंबाबत पक्षाचं नेतृत्व निर्णय घेईल, असं विधान भाजपचे कोकण प्रभारी विनय नातू यांनी केलंय.

Updated: Jul 21, 2014, 06:16 PM IST
राणेंसाठी भाजप नेते अनुकूल? title=

मुंबई: नारायण राणेंच्या प्रवेशाबाबत कोकणातले भाजप नेते अनुकूल असल्याची चर्चा आहे. आमची भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठींच्या कानी घातली आहे. राणेंबाबत पक्षाचं नेतृत्व निर्णय घेईल, असं विधान भाजपचे कोकण प्रभारी विनय नातू यांनी केलंय.

दरम्यान, नारायण राणे यांच्यासारख्या नेत्यांच्या पक्ष प्रवेशाबाबतचा निर्णय मेरिटवर घेतला जाईल, असं भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. तसंच राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत कोणताही प्रस्ताव नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.

राणेंनी मात्र आपण लवकरच राज्याचा दौरा करणार असून सुरूवात नागपूरपासून करणार असल्याचं सांगितलंय. याचा अर्थ काय राणे नागपूरात भेटणार का कोणाला? 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.