चेन्नई सुपरकिंग्जचा दिल्लीवर विजय
चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली डेअरडेव्हील्सवर 9 गडी राखून विजय मिळविला. मुरली विजय 48 तर सुरेश रैना 28 धावांवर नाबाद राहिले. चेन्नईसमोर 115 धावांचे आव्हान होते. मात्र मायकल हसी आणि मुरली विजय यांनी हे आव्हान लीलया पेलले.
May 12, 2012, 11:12 PM ISTवॉर्नरचा वार, हैदराबाद बाद!
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊन दिल्लीपुढे १८८ धावांचे जबरदस्त आव्हान ठेवणाऱ्या डेक्कनला वॉर्नर नावाच्या तुफानेने उद्धवस्त केले. डेविड वॉर्नरने ठोकलेल्या घणाघाती नाबाद शतकामुळे दिल्लीने डेक्कनवर ९ गडी व तब्बल २० चेंडू राखून जबरदस्त विजय मिळवला.
May 10, 2012, 10:03 PM ISTशाहरुखची कोलकता अव्वलस्थानी
शाहरुख खानच्या कोलकता नाइट रायडर्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सहा गडी राखून पराभव करत आयपीएलच्या गुण तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. गेल्या चार सीझनपासून खराब कामगिरी करणाऱ्या शाहरुखच्या केकेआरने यंदाच्या मोसमात जबरदस्त कामगिरी केली आहे.
May 7, 2012, 11:45 PM ISTदिल्लीचे कोलकत्यासमोर १५४ आव्हान
आयपीएलच्या पॉइंट टेबलमध्ये आघाडीच्या स्थानावर असलेल्या दिल्ली आणि कोलकात्यातील सामन्यात पहिल्या डावात दिल्लीने प्रथम फलंदाजी करीत कोलकात्याला १५४ धावांचे आव्हान दिले. अष्टपैलू इरफान पठाण (३६) जयवर्धने (३०) आणि कर्णधार वीरेंद्र सेहवागने ९ चेंडूत तीन चौकार व एक षटकारासह काढलेल्या २३ धावामुळे दिल्लीला १५३ धावांपर्यंत मजल मारता आली.
May 7, 2012, 10:12 PM ISTधोनीच्या चेन्नईला सेहवागचा दणका
केव्हिन पीटरसन आणि वीरेंद्र सेहवाग यांची तुफान फटकेबाजी चेन्नई सुपर किंग्जला आसमान दाखविले. आयपीएलचा बादशा म्हणून ओळखणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ वीरेंद्र सेहवागच्या दिल्ली डेअरडेव्हिल्ससमोर दुबला दिसला. प्रथम फलंदाजी करताना खेळाडूंनी नांगी टाकली. दिल्ली डेअरडेव्हिल्स चेन्नई सुपर किंग्जला आठ विकेट्सनी पराभवाचा दणका दिला. चेन्नईचे १११ धावांचे आव्हान दिल्लीने दोन विकेट्स गमावून अवघ्या १३.२ षटकांत पार केले.
Apr 11, 2012, 08:22 AM ISTदिल्ली डेअरडेव्हिल्सने टॉस जिंकला
आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि बंगळूरू रॉयल चॅलेंजर्स यांच्यात आज शनिवारी लढत होत आहे. दिल्लीचा कर्णधार वीरेंद्र सेहवागने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Apr 7, 2012, 05:38 PM IST