वॉर्नरचा वार, हैदराबाद बाद!

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊन दिल्लीपुढे १८८ धावांचे जबरदस्त आव्हान ठेवणाऱ्या डेक्कनला वॉर्नर नावाच्या तुफानेने उद्धवस्त केले. डेविड वॉर्नरने ठोकलेल्या घणाघाती नाबाद शतकामुळे दिल्लीने डेक्कनवर ९ गडी व तब्बल २० चेंडू राखून जबरदस्त विजय मिळवला.

Updated: May 10, 2012, 10:03 PM IST

www.24taas.com, हैदराबाद

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊन दिल्लीपुढे १८८ धावांचे जबरदस्त आव्हान ठेवणाऱ्या डेक्कनला वॉर्नर नावाच्या तुफानेने उद्धवस्त केले.  डेविड वॉर्नरने ठोकलेल्या घणाघाती नाबाद शतकामुळे दिल्लीने डेक्कनवर ९ गडी व तब्बल २० चेंडू राखून जबरदस्त विजय मिळवला.

डेविड वॉर्नर नाबाद १०९ धावा व नमन ओझा नाबाद ६२ धावा यांच्यामुळे दिल्लीने १८८ धावांचे आव्हान १६.४ षटकातच पूर्ण केले. तसेच या दोघांनी दुस-या विकेटसाठी सर्वोच्च अशी १८९ धावांची अखंडित भागीदारी केली.

वॉर्नरने ५४ चेंडूत ७ षटकार व १० चौकार मारत नाबाद १०९ धावांची खेळी साकारली. तर नमन ओझाने ४६ चेंडूत ५ षटकार व २ चौकारासह नाबाद ६४ धावा ठोकल्या. या विजयामुळे दिल्ली पुन्हा टॉपवर पोहचली आहे.

१८८ धावांचा पाठलाग करताना दिल्लीची खराब सुरुवात झाली होती. कर्णधार वीरेंद्र सेहवाग पहिल्याच षटकातील दुस-या चेंडूवर केवळ चार धावावर बाद झाला. त्याला शिखर धवनने आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढत कॅमेरुन व्हॉईटकडे झेल देण्यास भाग पाडले होते. मात्र त्यानंतर डेक्कनच्या एका गोलंदाजाला आपला प्रभाव पाडता आला नाही.