सुरेश जैन आज होणार कोर्टात हजर
जळगावमधल्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेल्या आमदार सुरेश जैन यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यांची नऊ दिवसांची पोलीस कोठडी आज संपत आहे.
Mar 19, 2012, 11:27 AM ISTसुरेशदादांची १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी
सुरेशदादा जैन यांना काल मध्यरात्री अटक केल्यानंतर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांची रवानगी १९ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
Mar 12, 2012, 09:08 AM ISTघरकुल घोटाळा : महापौरही संशयित आरोपी
जळगावमधल्या २९ कोटी ५९ लाखांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी जळगावचे महापौर सदाशिव ढेकळेंची एक तास कसून चौकशी करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक तसंच घोटाळ्याचे तपास अधिकारी इशू सिंधू यांनी त्यांची चौकशी केली.
Feb 21, 2012, 08:24 PM ISTघरकुल घोटाळा : सुरेश जैन यांची चौकशी
जळगावमधल्या २९ कोटी ५९ लाख रुपयांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी शिवसेना आमदार सुरेश जैन यांची सुमारे सव्वा तीन तास चौकशी झाली. जैन या गुन्ह्यात थेट आरोपी नसले तरी त्यांच्याविरूद्धच्या काही पुराव्यांच्या आधारे चौकशी झाली. या आधी परिवहन राज्यमंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांची चौकशी झाली.
Feb 3, 2012, 08:54 AM IST