घरकुल घोटाळा : महापौरही संशयित आरोपी

जळगावमधल्या २९ कोटी ५९ लाखांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी जळगावचे महापौर सदाशिव ढेकळेंची एक तास कसून चौकशी करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक तसंच घोटाळ्याचे तपास अधिकारी इशू सिंधू यांनी त्यांची चौकशी केली.

Updated: Feb 21, 2012, 08:24 PM IST

www.24taas.com, जळगाव

जळगावमधल्या २९ कोटी ५९ लाखांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी जळगावचे महापौर सदाशिव ढेकळेंची एक तास कसून चौकशी करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक तसंच घोटाळ्याचे तपास अधिकारी इशू सिंधू यांनी त्यांची चौकशी केली.

घरकुल घोटाळ्यात जळगावचे महापौर सदाशिव ढेकळे हे देखील संशयित आरोपी आहेत. या घोटाळ्यात पोलीस चौकशी करण्यात आलेले पालकमंत्री गुलाबराव देवकर, आमदार सुरेश जैन यांचीही चौकशी करण्यात आली होती. जळगावच्या नगराध्यक्षपदी गुलाबराव देवकर असताना हा घोटाळा झाला होता. घोटाळ्याच्या काळातील सर्व नगरसेवकांची चौकशी करण्यात येत आहे.

देवकर जळगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष असतानाच्या कार्यकाळात हा घोटाळा समोर आला होता. या घोटाळा प्रकरणात ते संशयित आरोपी आहेत. त्यावेळी उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष प्रदीप रायसोनी हेच कारभार चालवत होते आणि इतर नगरसेवकांनी केवळ सह्या करण्याचं काम केलं, असं स्पष्टीकऱण देवकरांनी दिलं आहे. नगरसेवकांना या घोटाळ्याची माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे

या प्रकरणी माजी महापौर प्रदीप रायसोनी, मुख्याधिकारी पी. डी. काळे यांच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे.