क्रिकेट मैदाना

अजिंक्य रहाणेच्या फॅनने एका सेल्फीसाठी उचलला हा धोका

फॅन्स आपल्या आवडत्या क्रिकेटरला भेटण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात.सचिन तेंडुलकरला तर त्याच्या चाहत्यांनी देवाचा दर्जा दिलाय. यंदाच्या आयपीएलमध्येही क्रिकेटर्सप्रती त्यांच्या चाहत्यांचे प्रेम पाहायला मिळतेय. चेन्नईचा कर्णधार धोनीच्या पाया पडण्यासाठी त्याचा एक चाहता सुरक्षाकडे भेदून आला. या घटनेनंतर अशीच एक घटना समोर आलीये. मंगळवारी राजस्थान आणि पंजाब यांच्यातील सामन्यादरम्यान ही घटना घडली. सामन्यात राजस्थानची गोलंदाजी सुरु होती. राजस्थानचे गोलंदाज पंजाबवर दबाव टाकून होते. 

May 9, 2018, 05:29 PM IST