ऑडिट विधानसभा मतदारसंघ

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - शिवाजीनगर

पुणे शहरातला सध्याचा सर्वाधिक बहुचर्चित विधानसभा मतदारसंघ... अर्थात शिवाजीनगर... 

Oct 7, 2014, 04:34 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघ - नाशिक मध्य

नाशिक मध्य विधानसबा मतदारसंघ वेगळ्याच कारणाने सध्या चर्चेत आहे. ज्या मनसेनेने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा आधार घेत नाशिक पालिकेत आपली सत्ता राखण्यास यश मिळविले आहे. राष्ट्रवादी-मनसेची झालेली महापालिकेतील अजब युती. या नव्या समीकरणांमुळे यावेळची विधानसभेची निवडणूक चांगलीच रंगणार आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार वसंत गीते आहेत.

Oct 1, 2014, 07:56 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघ - नांदगाव, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघ. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ इथे विद्यमान आमदार आहेत. पाच वर्षांतली विकासकामे आणि आगामी निवडणुकीत पंकज भुजबळ यांच्यापुढे काय आव्हानं असणार आहे. 

Oct 1, 2014, 07:50 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघ - बल्लारपूर, चंद्रपूर

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचा हा मतदारसंघ. मुनगंटीवार यांनी बल्लारपूरमधून चारवेळा आमदारकी भुषवली आहे. मुनगंटीवार यांचा विजयाचा हा महामेरू रोखण्यासाठी विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

Oct 1, 2014, 07:24 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघ - अहेरी,गडचिरोली

 आर. आर.पाटील पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघ. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम या दोन नेत्यांमध्ये इथे संघर्ष पाहायला मिळतो. मात्र दीपक आत्राम यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत इथे आमदारकी मिळवली. 

Oct 1, 2014, 07:15 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघ - कोपरी-पाचपाखाडी, ठाणे

ठाणे जिल्ह्यातल्या कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ. शिवसेनेचे एकनाथ शिंदे इथे विद्यमान आमदार आहेत. आगामी विधानसभेसाठी मनसे आणि काँग्रेसनेही इथे जोरदार फिल्डिंग लावली आहे.

Oct 1, 2014, 06:55 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघ - मुंब्रा-कळवा

 ठाण्यातील मुंब्रा-कळवा मतदारसंघ. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड इथे विद्यमान आमदार आहेत. सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. तर खासदार ओवेसी यांनी आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे आव्हाड यांना आता तगडे आव्हान या मतदार संघात असणार आहे.

Oct 1, 2014, 06:16 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघ - ठाणे शहर

 ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ. आमदार म्हणून निवडून आलेले राजन विचारे आता खासदारपदी विराजमान झालेत. आता काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले रवींद्र फाटक यांना सेनेने उमेदवारी दिली आहे. ते नारायण राणे समर्थक होते. या मतदार संघात सेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे फाटक यांना ही निवडणूक सोपी जाणार आहे.

Oct 1, 2014, 06:06 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघ - भंडारा

 भंडारा विधानसभा मतदारसंघ. शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर इथे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेनेच्या या लढाईत मित्रपक्षांच्या छुप्या हालचालीही तितक्याच महत्वपूर्ण ठरतात. 

Oct 1, 2014, 05:07 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघ - तुमसर, भंडारा

भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदार संघ पूर्वी भाजपचा गड समजला जाई. मात्र 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर अनिल बावनकर यांनी विजयी पताका फडकावली आणि हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला.  

Oct 1, 2014, 04:58 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघ - साकोली, भंडारा

 भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघ. इथले आमदार नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करत खासदारकी मिळवलीयं.  

Oct 1, 2014, 04:47 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघ - यवतमाळ

यवतमाळ विधानसभा मतदारसंघ. यवतमाळ जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघापैकी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या उमेदवारांची संख्या पाहता सर्वाधिक धुमशान यवतमाळमध्ये होण्याची चिन्हं आहेत. प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळा कौल हे येथील खास वैशिष्ट्य.

Oct 1, 2014, 04:36 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघ - आर्णी, यवतमाळ

 अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला यवतमाळचा आर्णी विधानसभा मतदारसंघ. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे येथून प्रतिनिधित्व करतात.

Oct 1, 2014, 04:22 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघ - पुसद, यवतमाळ

पुसद मतदारसंघ म्हणजे नाईक घराणे. पहिल्या निवडणुकीपासून नाईक घराण्यातील सदस्यच येथून निवडून आलेला आहे.  वसंतराव नाईक आणि सुधाकर नाईक असे दोन मुख्यमंत्री या मतदारसंघाने राज्याला दिले. सध्या इथे राष्ट्रवादीचे मनोहर नाईक नेतृत्व करतात.  

Oct 1, 2014, 04:11 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघ - धुळे ग्रामीण

धुळे ग्रामीण मतदारसंघ. एकेकाळी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून लक्ष वेधणारे रोहिदास पाटील यांना याच मतदारसंघात गेल्यावेळी पराभूत व्हावं लागलं. शिवसेनेच्या शरद पाटील यांनी त्यांचा पराभव केला. 

Oct 1, 2014, 03:56 PM IST