एसटी महामंडळ

महाड दुर्घटनेतील अपघातग्रस्तांना महामंडळाकडून मदत नाहीच

दीड महिना उलटल्यानंतरही सावित्री नदी पूल दुर्घटना प्रकरणातील अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांच्या यातना कमी झालेल्या नाहीत. राज्य शासनाची मदत मिळाली, पण परिवहन महामंडळाकडून मिळणारी आर्थिक मदत अद्याप लालफितशाहीत अडकली आहे हे दुर्दैवच मानावं लागेल.

Sep 22, 2016, 06:18 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

एसटी कर्मचाऱ्यांवर पगाराच्या बाबतीत सतत अन्याय होत असतो, असा आरोप एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून होत असतो.

Sep 4, 2016, 04:51 PM IST

आता एसटी कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलणार

एसटी कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलण्याच्या प्रस्तावाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे.

Jul 18, 2016, 02:23 PM IST

एसटीचा भोंगळ कारभार उघड, ११ कोटींहून अधिक प्रवाशांची एसटीकडे पाठ

एसटीच्या भोंगळ कारभारामुळं वर्षभरात तब्बल ११ कोटी ३२ लाख प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे. माहितीच्या अधिकारात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याशिवाय एसटीचा संचित तोटा १ हजार ९३४ कोटींवर पोहचला आहे. मात्र तरीही एसटीची सेवा आणि सुविधा सुधारण्यासाठी प्रशासन आणि सरकारकडून कोणतंही पाऊल उचललं जात नसल्याचं दिसतं.

Sep 23, 2015, 10:06 PM IST

एसटी महामंडळ करणार ७ हजार पदांची भरती

नवीन वर्ष नोकरीसाठी अनकूल असल्याचे दिसत आहे. एसटी महामंडळाने २०१५ची गुडन्यूज दिलेय. २०१४मध्ये गणेशोत्सवापूर्वी चालकांची भरती केलेली असतानाच आता नवीन वर्षात महामंडळाकडून आणखी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार ७ हजार चालकांची भरती केली जाण्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Dec 31, 2014, 11:18 AM IST

एसटी महामंडळाला जीवनदान देण्यासाठी सरकारचे महत्त्वाचे निर्णय

 एक हजार कोटी रुपयांच्या तोटयाच्या खड्यात असलेल्या एसटी महामंडळाला जीवनदान देण्याच्या दृष्टीनं सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेणार आहे.. राज्यात एसटीवर प्रवासी कर हा १७.५ टक्के आहे. यामुळं एसटीवर बोजा पडत दरवर्षी काही कोटी रूपये सरकारला द्यावे लागतात.

Dec 30, 2014, 01:13 PM IST

टोलचा फटका एसटी महामंडळाला

टोलनाक्यांमुळे राज्यभरात डोकेदुखी वाढली असताना आता, टोलचा फटका एसटी महामंडळाच्या नागपूर विभागालाही बसलाय. गेल्या तीन वर्षांपासून नागपूर विभाग तोट्यात आहे. तोट्याच्या रकमेपैकी जवळपास एक तृतीयांश रक्कम निव्वळ टोलसाठी खर्च होत असल्यानं एसटीचं चाक आणखी गाळात रूततंय.

May 3, 2014, 08:26 AM IST

मुंबईतील प्रवाशांच्या सोईसाठी एसटीच्या जादा बसेस

आज मुंबई शहर आणि परिसरात बेस्टची वाहतूक कोलमडल्यामुळे प्रवाशांच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीनं ज्यादा बसेस सोडण्याची व्यवस्था केलीय. मुंबई शहरात प्रवासी वाहतुकीसाठी ६० जादा बसेस सोडल्या आहेत.

Apr 1, 2014, 12:17 PM IST

एसटीच्या टोल रद्दला जयंत पाटलांचा विरोध

एकीकडे एसटीला टोल पूर्णपणे माफ करावा अशी मागणी केली जात असतांना ग्रामविकास मंत्री जयंत पाटील ह्यांनी मात्र एसटीनेही टोल भरावा असा आग्रह धरला आहे.

Feb 13, 2014, 09:59 PM IST

कडेवर मुल घेऊन तिचा लढा सुरू

स्त्रियांच्या आयुष्यात संघर्ष असतोच... मग ती एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीची सीईओ असो की गृहिणी... ही आहे एक कहाणी अशाच एका संघर्षाची.. एसटीची एक महिला कंडक्टर रोजच्या जगण्याची लढाई लढतेय... तिच्या लढयाला अद्याप यश आलेलं नाही... पण रोज धावणाऱ्या एसटीच्या चाकांवरचा तिचा लढा सुरुच आहे.

Feb 6, 2014, 03:38 PM IST

खुशखबरः रातराणीचे भाडे १५ टक्क्यांनी कमी

आज मध्यरात्रीपासून रातराणीच्या भाड्यात १५ टक्के कपात करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

Jan 14, 2014, 03:26 PM IST

<b>नोकरीची संधी:</b>कोकण विभाग एसटी, ९०० चालक पदं रिक्त

एसटीच्या चालक पदासाठी आठवी पासवरून दहावी पासची अट लागू केल्यानं एक वर्ष उलटलं तरी चालकांची संपूर्ण भरती होऊ शकली नाही. एसटीला कोकण विभागाचं सर्वाधिक टेन्शन असून, इथं चालक म्हणून कोणी पुढं येत नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय. त्यामुळं खास कोकण विभागासाठी चालक पदाची पुन्हा जाहिरात काढण्यात येणार असल्याचं एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.

Dec 10, 2013, 12:21 PM IST

कोकणचं आरक्षण फुल्ल... नो टेन्शन!

काही लहानग्यांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्यात तर काहींच्या होण्याच्या मार्गावर आहेत. साहजिकच सुट्ट्या लागल्यानंतर पहिला बेत तयार असतो तो गावच्या फेरफटक्याचा... गेल्या कित्येक वर्षांच्या अनुभावानं आता एसटी यासाठी तयार झालीय.

Apr 11, 2013, 04:18 PM IST