एसटी महामंडळ करणार ७ हजार पदांची भरती

नवीन वर्ष नोकरीसाठी अनकूल असल्याचे दिसत आहे. एसटी महामंडळाने २०१५ची गुडन्यूज दिलेय. २०१४मध्ये गणेशोत्सवापूर्वी चालकांची भरती केलेली असतानाच आता नवीन वर्षात महामंडळाकडून आणखी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार ७ हजार चालकांची भरती केली जाण्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Updated: Dec 31, 2014, 11:22 AM IST
 एसटी महामंडळ करणार  ७ हजार पदांची भरती title=

मुंबई : नवीन वर्ष नोकरीसाठी अनकूल असल्याचे दिसत आहे. एसटी महामंडळाने २०१५ची गुडन्यूज दिलेय. २०१४मध्ये गणेशोत्सवापूर्वी चालकांची भरती केलेली असतानाच आता नवीन वर्षात महामंडळाकडून आणखी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार ७ हजार चालकांची भरती केली जाण्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

ही भरती मे महिन्यापर्यंत होणार आहे. जवळपास ७ हजार चालकांची भरती केली जाणार असल्याचे एसटी महामंडळातील सूत्रांनी सांगितले. या भरतीबाबत मे २०१५पर्यंत कार्यवाही केली जाणार असून, त्याची लवकरच प्रक्रियाही सुरू होण्याचे संकेत आहेत.

गर्दीच्या हंगामात हे चालक मिळण्यासाठी एसटी प्रयत्नशील असेल, असेही सांगण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे आधीच्या भरतीतील राहिलेले १,४०० चालकही या नवीन भरतीत समाविष्ट असतील.

त्याआधी गणेशोत्सवापूर्वी मुंबई विभागात २,८०० चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी २३ मार्च रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर १६ ते २७ जूनपर्यंत एसटीच्या मुंबई विभागात विद्याविहार येथे शारीरिक पात्रता छाननी आणि कागदपत्रांची छाननी करण्यात आली. 

ही सर्व प्रक्रिया पार पडेपर्यंत आणि चालक ताफ्यात येईपर्यंत बराच उशीर झाला. या भरती प्रक्रियेतील १,४०० चालक मिळाले असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. 

मुंबई विभागात चालकांची कमतरता असल्याचे सांगण्यात येत आहे. नवीन वर्षात चालकांची मोठी भरती करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतल्याचे समजते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.