निवडणुकीचा सातवा टप्पा : गुजरातमध्ये 62% मतदान
देशातल्या सातव्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडलंय. या टप्प्यात सात राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातवल्या ८९ जागांचा समावेश आहे. गेल्या सहा टप्प्यांसारखाच या टप्प्यातही मतदारांनी चांगला प्रतिसाद दिलाय.
Apr 30, 2014, 07:34 PM IST...असं झालं निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात मतदान
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. ९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ८९ जागांवर आज मतदान पार पडत आहे. गुजरातसह, उत्तरप्रदेश आणि बिहारमधील अत्यंत बड्या नेत्यांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
Apr 30, 2014, 11:50 AM ISTउत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपा-राज ठाकरे मैत्री कळीचा मुद्दा!
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना जाहीर पाठिंबा दिला. एवढंच नव्हे तर मुंबई आणि इतर ठिकाणी भाजप उमेदवारांच्या विरोधात आपले उमेदवारही उभे केले नाहीत.
Apr 27, 2014, 03:32 PM ISTउधार पैशांवरून सतत अडीच वर्ष बलात्कार
पैसे उधार घेतल्याने एका महिलेवर सतत बलात्कार करण्याची घटना उत्तर प्रदेशमधील गाजियाबादमध्ये घडली आहे.
Apr 21, 2014, 10:57 AM ISTउत्तर प्रदेशात आठ राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा पणाला!
उत्तर प्रदेशात यंदाची लोकसभा निवडणूक म्हणजे अनेकांच्या प्रतिष्ठेची बनली आहे. इथल्या आठ राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा यंदा पणाला लागलीय. १७ आणि २४ एप्रिलला होणार्या पाचव्या आणि सहाव्या टप्प्याच्या मतदानात दिग्गज राजकारण्यांचा फैसला होणार आहे.
Apr 17, 2014, 04:15 PM ISTबलात्काराचा बदला घेण्यासाठी गँगरेप
उत्तरप्रदेशच्या बाराबंकीमध्ये चार तरुणांनी एका विवाहित महिलेसोबत गँगरेप केल्याची धक्कादायक घटना घडलीय. इथल्या हैदरगढ परिसरात हा गुन्हा घडला. इथल्या एका गावात आदिवासी आळीत बदला घेण्यासाठी एका विवाहित महिलेचं अपहरण करून चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेत एक महिला आणि तिचा नवराही सहभागी होता.
Apr 14, 2014, 04:13 PM ISTमोदींच्या हत्येसाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांना अटक
उत्तर प्रदेश एटीएसनं बुधवारी रात्री गोरखपूर रेल्वे स्टेशनजवळून दोन संशयित मानवी बॉम्बला अटक करण्यात आलीय. त्यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात हत्यार आणि दारुगोळा जप्त करण्यात आलाय. तसंच दहशतवाद्यांजवळून बॉम्ब बनवण्याचं साहित्यही आढळलं.
Mar 27, 2014, 04:57 PM ISTमुलींनी जीन्स पॅंट घालू नये यासाठी फतवाच
उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा पंचायतीचा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. या पंचायतीने मुलींना जीन्स पॅंट घालण्याबाबत फतवा काढला आहे. मुलींनो जीन्स पॅंट घालू नका, असा फतवा आहे.
Mar 27, 2014, 09:53 AM ISTनवरा आवडल्याने मैत्रिणीला घातली गोळी!
लखनऊमधील इस्माइलगंज भागातील प्रॉपर्टी डिलर आणि समाजवादी पक्षाचे कार्यकर्ता बबलू सिंह यांच्या पत्नीची घरात गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. बबलू यांची पत्नी दीपा हिची मैत्रीण सुमन हिने दारूच्या नशेत दीपाला गोळ्या झाडून ठार केले.
Jan 29, 2014, 02:04 PM IST<B> <font color=red>व्हिडिओ: </font></b> उत्तर प्रदेश पोलिसांची महिलांवर दादागिरी, अमानुष मारहाण</b>
उत्तर प्रदेश सरकारच्या समाजवादाचा आणखी एक चेहरा समोर आलाय. उत्तर प्रदेश पोलिसांची महिलांवर दादागिरी दिसून आलीय. इथं पोलिसांनी मागं पुढं न पाहता थेट महिलांना अमानुष मारहाण केलीय.
Jan 14, 2014, 01:56 PM ISTकॉन्स्टेबलनं मित्रांसोबत मिळून केला १०वीच्या विद्यार्थिनीवर गँगरेप
उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद इथल्या एका पोलीस स्टेशनच्या कॉन्स्टेबलनं आपल्या दोन मित्रांसोबत मिळून मोदीनगर भागात दहाव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी या गँगरेपचा व्हिडिओ बनवून पीडित मुलीला धमकी दिली की याबाबत कोणालाही सांगितल्यास व्हिडिओ इंटरनेटवर टाकू.
Jan 12, 2014, 01:42 PM ISTअखिलेश सरकारचा 'सैफई महोत्सवा'त ३०० कोटींचा चुराडा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपला आजचा कार्यक्रम अचानक बदलून देढ इश्किया या आज प्रदर्शीत होणा-या हिंदी चित्रपटाच्या प्रीमियर शोला दांडी मारली. मुजफ्फरनगर आणि शामली येथील छावणीतील दंगलग्रस्तांच्या मूलभूत गरजाही मदतकार्यातून भगवल्या जात नाहीत तर दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारनं सैफई महोत्सवात तब्बल ३०० कोटींचा चुराडा केल्यानं अखीलेश यादव सरकार वादाच्या भोव-यात सापडलंय.
Jan 10, 2014, 09:36 PM ISTमुख्यमंत्री अखिलेश यादव मीडियावर घरसले
एकीकडे भाकरीच्या एका तुकड्यासाठी तडफडणारे. थंडीत कुडकुडत जीव सोडणारे दंगलग्रस्त तर दुसरीकडे सैफईत झालेला नेते मंडळींचा फिल्मी मसाला. असं काहीसं चित्र काल उत्तरप्रदेशात पाहायला मिळालं. दरम्यान, टीकेची झोड उठली असताना माफी मागायचं सोडून मुख्यमंत्री अखिलेश यादव महोदय मीडियावरच घसरले.
Jan 10, 2014, 05:10 PM ISTसैफई महोत्सवात अवतरलं बॉलिवूड!
सैफई महोत्सवावरून उत्तर प्रदेश सरकार चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे.. एकीकडे मुजफ्फरनगरमध्ये गरीब मजूर कडाक्याच्या थंडीचे बळी जात असताना सैफईमधे उत्तर प्रदेश सरकारनं समाजवादी पार्टीच्या नेतेमंडळींच्या मनोरंजनासाठी आलिशान महोत्सवाचं आयोजन केलंय.
Jan 9, 2014, 02:51 PM IST१ हजार टन सोनं शोधायला बाबा शोभन सरकारच मैदानात
आपल्या सोन्याच्या स्वप्नानं संपूर्ण देशाला हादरवून सोडणारे बाबा शोभन सरकार आता स्वत:च सोन्याचा शोध घेण्यासाठी मैदानात उतरले आहेत. `चमत्कार होणारच, सोनं मिळणारच` असा ठाम दावा करत सरकारांनी आपल्या भक्तांना खोदकामाचे आदेश दिले आहेत.
Nov 23, 2013, 12:53 PM IST