आषाढी एकादशी

विवाहेच्छुकांसाठी पाच महिन्यांचा ‘मेगाब्लॉक’

लग्नाच्या बेडीत अडकण्यास उत्सुक असलेल्या वधुवरांना आता आणखी पाच महिन्यांचा मेगाब्लॉक सहन करावा लागणार आहे. आषाढी एकादशीपासून पाच महिन्यांचा चातुर्मास सुरू होत असल्याने देव २४ नोव्हेंबरपर्यंत झोपी गेले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीच्या धामधुमीत धूमधडाक्यात लग्नाचा बार उडवण्यास इच्छुक असलेल्यांना देव जागे होईपर्यंत पाच महिने वाट पाहावी लागणार आहे.

Jul 2, 2012, 07:17 PM IST

महाराष्ट्राच्या ‘बाबां’चं विठुरायाकडं साकडं...

शनिवारी मध्यरात्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विठूरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्र्यांनी सपत्निक विठूरायाची पूजा केली. पांडुरंगाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न झाली.

Jun 30, 2012, 11:03 AM IST

‘याचसाठी केला अट्टहास...’

ज्या क्षणांची लाखो वारकरी वाट पाहत होते तो दिवस आज उगवलाय. पंढरपूरच्या सावळ्या विठूरायाच्या दारात उभं राहून साजरं रुप डोळ्यात साठवणं हे एका क्षणात वारीचं सार्थक झाल्यासारखं असतं. त्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झालेत.

Jun 30, 2012, 10:42 AM IST

फड दांम्पत्य ठरले ‘मानाचे वारकरी’

गेल्या अनेक वर्षांपासून राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात येते. शिवाय यावेळी मुख्यमंत्र्यासह पूजेचा मान एका वारकरी दाम्पत्याला मिळतो. यंदा लातूरमधल्या हकनाकवाडीच्या फड दाम्पत्याला मानाचे वारकरी हा मान मिळाला.

Jun 30, 2012, 10:37 AM IST

आषाढीचं एक नवं ‘रिंगण’!

आपल्याकडे दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा आहे. गुढीपाडवा आणि गणपतीचेही विशेषांकही निघतात. आषाढीची वारी हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सोहळा. मग आषाढी अंक का नाही? म्हणूनच 'आषाढीचा वार्षिक अंक' ही नवी संकल्पना यंदाच्या आषाढी एकादशीपासून प्रत्यक्षात येत आहे.

Jun 27, 2012, 05:38 PM IST