शीतल म्हात्रे प्रकरणः ठाकरेंनी नाही महिला आयोगाने घेतली दखल
शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांच्याकडून आपल्याला मानसिक त्रास होत असल्याने शिवसेना नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याची तयारी करणाऱ्या नगरसेवक शीतल म्हात्रे यांच्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे.
Jan 16, 2014, 04:59 PM ISTशिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांचा राजीनामा मागे
शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांच्याकडून आपल्याला मानसिक त्रास होत आहे, म्हणून आपण शिवसेना नगरसेवकपदाचा राजीनामा देणार आहोत, असं नगरसेवक शीतल म्हात्रे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, रात्री उशिरा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा पाठिमागे घेतला.
Jan 16, 2014, 09:24 AM ISTशीतल म्हात्रेंचे आरोप आमदार घोसाळकर यांनी फेटाळले
आमदार विनोद घोसाळकर यांनी शीतल म्हात्रे यांनी लावलेले आरोप फेटाळून लावले आहेत. पक्ष नेतृत्वाने प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते, मात्र माजी महापौर शुभा राऊळ आणि नगरसेविका शीतल म्हात्रे या चौकशीच्या बैठकीला उपस्थित राहिले नसल्याचं विनोद घोसाळकर यांनी म्हटलं आहे.
Jan 15, 2014, 09:01 PM IST