या खेळाडूला चौथ्या क्रमांकावर खेळवा, जहीर खानचा सल्ला

भारताचा माजी फास्ट बॉलर जहीर खाननं भारतीय टीमला सल्ला दिला आहे.

Updated: Sep 20, 2018, 06:36 PM IST
या खेळाडूला चौथ्या क्रमांकावर खेळवा, जहीर खानचा सल्ला title=

मुंबई : भारताचा माजी फास्ट बॉलर जहीर खाननं भारतीय टीमला सल्ला दिला आहे. वर्ल्ड कपची तयारी म्हणून भारतानं महेंद्रसिंग धोनीला चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवण्यात यावं, असं जहीर म्हणाला. धोनी अनुभवी असल्यामुळे त्यानं चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करावी. चौथा क्रमांक महत्त्वाचा आहे कारण या स्थानावर बॅटिंग करताना परिस्थितीनुसार दबाव झेलावा लागतो, असं वक्तव्य जहीरनं केलं आहे. ज्या मॅचमध्ये चांगली सुरुवात मिळाली तेव्हा भारताचा विजय झाला. पण चांगली सुरुवात मिळात नाही तेव्हा अनुभवाची गरज असते, अशी प्रतिक्रिया जहीरनं दिली.

मिडल ऑर्डर भारताची चिंता

गेल्या काही दिवसांपासून वनडेमध्ये मिडल ऑर्डर भारतासाठी चिंतेची बाब बनली आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर भारतानं अनेक खेळाडूंना संधी दिली, पण कोणालाच त्याचं स्थान पक्कं करता आलं नाही. सध्या भारताकडे या दोन क्रमांकासाठी अंबाती रायुडू, केदार जाधव, दिनेश कार्तिक आणि मनिष पांडे हे पर्याय आहेत.

२०१५ वर्ल्ड कपमध्ये अजिंक्य रहाणेनं ७ पैकी ६ मॅचमध्ये चौथ्या क्रमांकावर बॅटिंग केली होती. तर पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये सुरेश रैना चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आला होता. त्या मॅचमध्ये रैनानं ७४ रनची खेळी केली होती. २०११ सालच्या वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंग, विराट कोहली, युसूफ पठाण आणि गौतम गंभीर चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आले होते. चौथ्या क्रमांकावर विराटनं दोन शतकं लगावली होती. पण पुन्हा तो तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला यायला लागला. यानंतर चौथ्या क्रमांकासाठी भारतानं वेगवेगळे प्रयोग केले जे अयशस्वी ठरले.