हिटमॅन रोहित शर्माला मिळाली 'Senorita' पण...

युजवेंद्र चहलने रोहित शर्मासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Updated: Mar 26, 2021, 09:40 AM IST
हिटमॅन रोहित शर्माला मिळाली 'Senorita' पण... title=

मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड वन डे सीरिज सुरू आहे. या सीरिजमधील दुसरा सामना आज पुण्यामध्ये खेळला जाणार आहे. पहिल्या वन डे सामन्यात 66 धावांनी इंग्लंडवर विजय मिळवला आहे. रोहित शर्माला सॅनियोरिटा मिळाल्याची माहिती युजवेंद्र चहलनं दिली. त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे.

युजवेंद्र चहलने रोहित शर्मासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोंमध्ये रोहित चहलला फूल देत आहे. पिवळ्या रंगाचं फूट रोहित युजवेंद्रला देत असताना दोघंही खूप खूश होतात.

 चहलने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'सेनोरीटा'. चहलने काही मजेदार इमोजीसुद्धा या कॅप्शनमध्ये दिले आहेत. चहल आणि रोहितच्या या फोटोला चाहत्यांकडूनही भन्नाट कमेंट्स येत आहेत. 

रोहित शर्मा आणि युजवेंद्र चहल ही जोडी खूप लोकप्रिय आहे. मैदानाबाहेरच्या विश्वामध्ये दोघंही खूप वेगवेगळ्या गोष्टी, विनोद, मजेशीर व्हिडीओ फोटो शेअर करत असतात.

या फोटोवर रोहितची पत्नी रितिका सजदेहने इमोजी पोस्ट केली आहे. तर चहलची पत्नी धनश्री यांनी यावर फोटो क्रेडिट न दिल्यानं नाराजी व्यक्त करत लिहिलं की दोघांनाही या पोजसाठी विचारण्याची गरज नव्हती. फोटो क्लिक क्रेडिट दिल्याबद्दल धन्यवाद असं म्हणत इमोजी शेअर केल्या आहेत.