दक्षिण आफ्रिकेत चहलने रचला इतिहास

सुपरस्पोर्ट्स पार्क मैदानावर आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना भारताने जिंकला. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 4, 2018, 05:39 PM IST
दक्षिण आफ्रिकेत चहलने रचला इतिहास title=

सेंच्युरीयन : सुपरस्पोर्ट्स पार्क मैदानावर आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना भारताने जिंकला. 

सलग दुसरा विजय

भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदांजीचा निर्णय घेतला. भारतीय फिरकी पुढे दक्षिण आफ्रिकेचा पूर्ण संघ 118 रनवर ढासळला. भारताने दुसरा सामना देखील सहज जिंकला. कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलच्या बॉलचा सामना कोणीच करु नाही शकले. 32.2 ओव्हरमध्ये आफ्रिकेची संपूर्ण टीम ऑलऑऊट झाली. चहलने पाच विकेट तर कुलदीपने तीन विकेट घेतल्या. 

चहलचा रेकॉर्ड

चहलने 5 विकेट घेत नवा रेकॉर्ड बनवला आहे. दक्षिण आफ्रिेकेच्या विरोधात त्यांच्याच देशात वनडे सामन्यामध्ये 5 विकेट घेणारा तो पहिला स्पिनर ठरला आहे. याशिवाय आफ्रिेकेविरोधात वनडेमध्ये चांगली कामगिरी गोलदाजी करणारा बॉलर बनला आहे. चहलने 22 रन देऊन 5 विकेट घेतले.

कुलदीपने आठ ओव्हरमध्ये फक्त 20 रन दिले. चहलने 8.2 ओव्हरमध्ये 22 रन दिले. चहलने पहिल्यांदा वनडेमध्ये 5 विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचा हा घरच्या मैदानात सर्वात कमी स्कोर आहे.