Yuvraj Singh's Birthday: 'जसं तू माझ्यावर...', युवराजला शुभेच्छा देताना सेहवाग काय बोलून गेला!

Virender Sehwag Instragram On Yuvraj Singh's Birthday: ना इंग्लंड ना ऑस्ट्रेलिया, पठ्ठ्यानी कोणालाच सोडलं नाही. युवराजच्या कामगिरीसमोर सहा सिक्स ते किरकोळ... मात्र, सेहवागच्या शुभेच्छांची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

Updated: Dec 12, 2022, 07:54 PM IST
Yuvraj Singh's Birthday: 'जसं तू माझ्यावर...', युवराजला शुभेच्छा देताना सेहवाग काय बोलून गेला! title=
Virender Sehwag, Yuvraj Singh

Happy Birthday Yuvraj Singh: जीवापेक्षा देशाला आणि देशसेवेला प्राधान्य देणारे खूप कमी लोक असतात. जीवाची पर्वा न करता वर्ल्ड कप भारताला जिंकवून देणारा खेळाडू म्हणजे सिक्सर किंग (Yuvraj Singh) युवराज सिंह. 6 फुट 2 उंच उंचाचा हा खेळाडू ज्यावेळी मैदानात उतरायचा त्यावेळी अनेकजण टीव्हीसमोर उठायचे देखील नाही. एवढंच काय... पोरांनी 'युवराज खेळतोय' ऐकल्यावर लेक्चरला दांड्या देखील मारल्यात. हाच युवराज आज 41वा वाढदिवस साजरा करत आहे. (Yuvraj Singh is celebrating his 41st birthday)

ज्यांनी 2007 चा वर्ल्ड कप (WC 2007) पाहिलाय, त्या क्रिकेट प्रेमींसाठी युवराज (Yuvraj Singh) म्हणजे जिव्हाळ्याचा विषय... धोनीची (MS Dhoni) क्रेझ नव्हती तेवढा युवराज गाजला. ना इंग्लंड ना ऑस्ट्रेलिया, पठ्ठ्यानी कोणालाच सोडलं नाही. युवराजच्या कामगिरीसमोर सहा सिक्स ते किरकोळ... मात्र, तो रेकॉर्ड आजही सर्वांच्या लक्षात राहिला. युवराजच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताने 2007 चा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप आणि 2011 चा वनडे वर्ल्ड कप (WC 2011) जिंकला. दोन्ही वर्ल्ड कपमधील युवराजची कामगिरी भविष्यात कधीही पुसता येणार नाही.

युवराजचा आज 41 वा वाढदिवस (Yuvraj Singh's Birthday) आहे. त्यामुळे त्यावर आज शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अशातच आता भारताचा माजी सलामीवीर आणि स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग (virender sehwag) यांनी युवराजला शुभेच्छा दिल्या. मात्र, सेहवागच्या शुभेच्छांची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

आणखी वाचा - Yuvraj Singh: रोनाल्डोला‌ रडताना पाहून युवराज झाला भावूक; ट्विट करत म्हणाला...

सेहवागने इस्टाग्राम पोस्ट (Virender Sehwag Instagram Post) करत युवराजला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सेहवाग पोस्टमध्ये म्हणतो...'बॉलरों के ऊपर पर भी ऐसे ही चढते थे जैसे मेरे ऊपर ही तस्वीर में चडे हैं. माझ्या प्रिय मित्र युवराज सिंहला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...जश्न मनाके युवी, आओ कभी हवेली पे', असं कॅप्शन सेहवागने (Virender Sehwag On Yuvraj Singh) दिलं आहे.

पाहा पोस्ट -

दरम्यान, सेहवागच्या हटके शुभेच्छांमुळे (Best wishes from Sehwag to yuvraj) सेहवाग पुन्हा चर्चेचा विषय राहतोय. युवराज आणि सेहवागची केमिस्ट्री वेगळी...ड्रेसिंग रूमचे (Dreesing Room) किस्से सांगताना दोन्ही एकमेकांबद्दल खुलासा करताना दिसतात. मात्र, आता दोघांनी रिटायर्डमेंट घेतली आहे. अनेकदा लिजेंड लीगमध्ये (Legend League) दोघेही खेळताना दिसतात.