युवराज सिंगने आपल्या या फेव्हरेट अभिनेत्रीसोबत सेल्फी केला क्लिक

टीम इंडियात सध्या स्थान न मिळवू शकलेल्या युवराज सिंग हा टीममध्ये पूनरागमन करण्यासाठी आपल्या फिटनेसकडे लक्ष देत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 21, 2017, 03:36 PM IST
युवराज सिंगने आपल्या या फेव्हरेट अभिनेत्रीसोबत सेल्फी केला क्लिक title=

नवी दिल्ली : टीम इंडियात सध्या स्थान न मिळवू शकलेल्या युवराज सिंग हा टीममध्ये पूनरागमन करण्यासाठी आपल्या फिटनेसकडे लक्ष देत आहे.

३०४ वन-डे मॅचेस खेळलेल्या युवराज सिंगने शेवटची वन-डे मॅच जून महिन्यात वेस्टइंडिज विरोधात खेळली होती. सध्या युवराज सिंगला ऑस्ट्रेलिया सीरिजमधून वगळण्यात आलं आहे. तसेच यापूर्वी झालेल्या श्रीलंका दौऱ्यातही युवराजला वगळण्यात आलं होतं.

टीम इंडियाचा सिक्सर किंग अशी ओळख असलेल्या युवराज सिंग याची भेट गुरुवारी आपल्या फेव्हरेट अभिनेत्रीसोबत झाली. आपली फेव्हरेट अभिनेत्री काजोल भेटल्यानंतर युवराजला रहावलं नाही आणि त्याने तिच्यासोबत सेल्फी काढला. त्यानंतर युवराज सिंगने हा सेल्फी सोशल मीडियात शेअरही केला.

हा फोटो पोस्ट करत युवराजने म्हटलं की, जेव्हा तुमची फ्लाईट लेट होते आणि अचानक तुमची भेट फेव्हरेट अभिनेत्रीसोबत होते... Day is made @kajol.

हा फोटो सोशल मीडियात पोस्ट केल्यानंतर एका तासातच या फोटोला चाळीस हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे.

 

When your flight is delayed and then u bump into your favourite actor ! Day is made @kajol

A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial) on

दरम्यान, ऑस्ट्रेलिया सीरिजसाठी पहिल्या तीन वन-डे मॅचसाठी युवराज सिंगचं सिलेक्शन न झाल्याने त्याच्या चाहत्यांनी बीसीसीआयवर टीका केली होती.