पाकिस्तानच्या दिग्गज फलंदाजानं कोचच्या मानेवर ठेवला चाकू, जीव वाचवण्यासाठी इतर खेळाडूंनी ठोकली धूम

पाकिस्तानचे माजी बॅटिंग कोच ग्रान्ट फ्लावर यांच्यासोबत 5 वर्षांपूर्वी असाच एक प्रकार घडला होता.

Updated: Jul 1, 2021, 04:01 PM IST
पाकिस्तानच्या दिग्गज फलंदाजानं कोचच्या मानेवर ठेवला चाकू, जीव वाचवण्यासाठी इतर खेळाडूंनी ठोकली धूम title=
मुंबई: क्रिकेटच्या मैदानात छोट्या मोठ्या कारणांवरून हेवेदावे आणि भांडण होत असल्याचं पाहिलं असेल. पाकिस्तानच्या खेळाडूनं चक्क कोचच्या मानेवरच चाकू धरला. आपला जीव वाचवण्यासाठी बाकीच्या खेळाडूंनी धूम ठोकली होती. 
 
पाकिस्तानचे माजी बॅटिंग कोच ग्रान्ट फ्लावर यांच्यासोबत 5 वर्षांपूर्वी असाच एक प्रकार घडला होता. हा धक्कादायक प्रकार त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ग्रान्ट फ्लॉवरच्या म्हणण्यानुसार, जेव्हा पाकिस्तान संघ 2016मध्ये 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता, तेव्हा यूनिस खानने त्याच्या गळ्यावर चाकू ठेवला होता. 
 
ग्रान्टने यूनिसला सामन्या दरम्यान सल्ला देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी यूनिसने कोचच्या गळ्यावर चाकू ठेवला. त्यावेळी या प्रकरणात हेड कोच मिकी आर्थर यांना मध्यस्ती करावी लागली होती. 
 
झिम्बाब्वेच्या फ्लवर प्रशिक्षक कारकीर्दीत त्याला आलेल्या अडचणींबद्दल विचारले असता, 50 वर्षीय प्रशिक्षकाने यूनुसच्या घटनेची आठवण करून दिली. 2014 ते 2019 या काळात ग्रान्ट फ्लावर पाकिस्तानचा फलंदाजी प्रशिक्षक होते. फ्लवर सध्या श्रीलंकेचा फलंदाजी प्रशिक्षक आहे.  त्यांनी एक मुलाखती दरम्यानचा त्यांचा अनुभव शेअर केला. 'युनिस खान...त्याला शिकवणे खूप कठीण आहे.'
 
'ब्रिस्बेनची घटना मला आजही आठवते. कसोटी सामन्यावेळी नाश्त्या दरम्यान मी काहीतरी युनिसला सल्ला देण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र त्याला माझा सल्ला आवडला नसावा बहुतेक. त्याने थेट माझ्या गळ्यावर चाकूच ठेवला. या प्रकरणात मिकी आर्थर यांना मध्यस्ती करावी लागली होती.' त्यावेळी युनिस पहिल्या डावात डकआऊट झाला होता. दुसऱ्या डावात त्याने 65 धावा केल्या. तिसऱ्या डावात 175 धावा केल्या होत्या.