Kane Williamson: यंदाच्या वर्ल्डकपची पहिली सेमीफायनल 2023 आज वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. भारत विरूद्ध न्यूझीलंड ( India vs New Zealand ) यांच्यात हा सामना रंगणार असून विजेत्या टीमला थेट सेमीफायनलचं तिकीट मिळणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही टीम्सच्या कर्णधारांची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी न्यूझीलंडच्या टीमचा कर्णधार केन विलियम्सनने ( Kane Williamson ) भारताचाविरूद्ध मोठं आव्हान असल्याचं म्हटलंय.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने ( Kane Williamson ) पत्रकार परिषदेत सांगितलं की, हे मोठं आव्हान असणार आहे. सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे, त्याच्याकडे अनेक प्रकारचे शॉट खेळण्याची क्षमता आहे. पण आमच्या टीममधील प्रत्येकजण तंदुरुस्त आहेत. यंदाच्या वेळी आम्हाला संधी आहे. आम्ही अनेकदा जवळ आलो आहोत.
केन विलियम्सन पुढे म्हणाला, भारत सर्वोत्तम टीमपैकी एक आहे. पण आम्हाला पण माहितीये की, जो दिवस आमचा आहे, त्यादिवशी आम्ही कोणालाही हरवू शकतो. हार्दिकच्या दुखापतीनंतर भारताचा समतोल बदललाय. यावेळी रचिनने जबरदस्त खेळ दाखवला आहे. तो ज्या पद्धतीने रन करतोय ते विलक्षण आहे. वनडे क्रिकेट आणि वर्ल्डकपला चांगला प्रतिसाद मिळालाय. सध्या वर्ल्डकपच्या सेमीफायनल फेरीत भारताविरुद्ध खेळणं खास आहे.
तुम्ही आमच्या टीमला अंडरडॉग्स म्हणता, पण त्याने आम्हाला काहीच फरक पडत नाही. आमच्या बहुतेक खेळाडूंनी वानखेडे स्टेडियममध्ये एवढ्या मोठ्या प्रसंगी एकही सामना खेळला नाहीये. हे आमच्यासाठी कठीण आव्हान असणार आहे. टीम इंडिया सध्या खूप चांगलं क्रिकेट खेळतंय, असंही केनने ( Kane Williamson ) सांगितलं आहे.
2019 च्या वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा न्यूझीलंडच्या टीमकडून 18 रन्सने पराभव झाला. या पराभवामुळे टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर पडली होती. सध्या भारतीय टीम वर्ल्डकप 2023 चा पहिला उपांत्य सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने अजून एकंही सामना गमावलेला नाही.