WTC Final 2023: येत्या 7 तारखेपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पिशनशिपचा ( ICC World Test Championship ) फायनल सामना खेळवला जाणार आहे. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( IND vs AUS ) यांच्यामध्ये हा सामना खेळवला जाणार असून इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर हा सामना रंगणार आहे. दरम्यान या सामन्याबाबत इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिलने ( International Cricket Council ) एक मोठी घोषणा केली आहे. या महत्त्वाच्या सामन्यामध्ये कोणता बॉल वापरला जाणार याची माहिती देण्यात आली आहे.
क्रिकेटच्या बॉलवर अनेकदा पूर्ण खेळ फिरू शकतो. अशावेळी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) फायनल सामन्यात कोणता बॉल वापरण्यात येणार, याविषयी चाहत्यांच्या मनात खूप मोठा प्रश्न आहे. 31 मे रोजी आयसीसीने ( International Cricket Council ) त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याची माहिती दिलीये.
WTC Final 2023 सामन्यामध्ये ड्यूक बॉलच्या मदतीने सामना खेळवणार आहे. मुख्य म्हणजे, टीम इंडियासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे कारण, आयपीएलमध्ये ( IPL 2023 ) याच बॉलने टीम इंडियाचे खेळाडू खेळत होते. त्यामुळे या बॉलने खेळण्याचा सराव टीम इंडियाच्या खेळाडूंना आहे.
मात्र दुसरीकडे ऑस्ट्रेलिया टीमच्या ( Australian Men’s Cricket Team ) खेळाडूंना या बॉलचा सराव नाहीये. इंग्लंडमध्ये आल्यानंतर ऑस्ट्रेलिया टीमच्या खेळाडूंनी अभ्यास केला आहे. त्यामुळे आता या बॉलच्या वापराने ऑस्ट्रेलिया खेळाडूंच्या खेळावर परिणाम होतो का? हे पहावं लागणार आहे.
ICC ने त्यांच्या वेबसाईटवर अक्षर पटेलचा एक इंटरव्ह्यू शेअर केलाय. यामध्ये WTC फायनल ड्यूक बॉलने खेळवण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. या इंटरव्ह्यूमध्य अक्षर म्हणालाय की, आयपीएलमध्ये त्याने ड्यूक बॉलने सराव करत होता.
7 ते 11 जून या कालावधीत मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळवण्यात येणार आहे. दरम्यान पावसानं धुमाकूळ घातल्यास किंवा सामना अनिर्णित राहिला तर काय? यावेळी कोणती टीम विजयी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. WTC Final मध्ये पाऊस आला तर हा सामना 12 जून या Reserve Day ला खेळवण्यात येणार आहे.