WTC Final 2021 | पावसाच्या व्यत्ययामुळे पहिला दिवसाचा खेळ वाया

बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

Updated: Jun 18, 2021, 08:06 PM IST
WTC Final 2021 | पावसाच्या व्यत्ययामुळे पहिला दिवसाचा खेळ वाया  title=

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील अंतिम सामन्यातील पहिला दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिला दिवशी खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे पहिला दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (wtc final 2021 india vs new zealand  Day 1 has been called off due to rains)

खेळ रद्द झाल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे. साऊथम्पटनमध्ये सकाळपासून पावसाची रिमझिम सुरुच होती. यामुळे टॉसही उडवता आला नाही. फिल्ड अंपायर्सनी वेळोवेळी खेळपट्टी खेळण्यासाठी योग्य आहे का, याची पाहणी केली. त्यामुळे पंचांनी पहिल्या सत्राचा खेळ रद्द केला. पण पाऊस थांबण्याच नाव घेत नव्हता. यामुळे अखेरीस पहिला दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान आता पहिला दिवसाचा खेळ वाया गेला आहे. त्यामुळे या दिवसाची भरपाई ही राखीव दिवसात काढली जाणार आहे. या महामुकाबल्यासाठी 23 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. तसेच दुसऱ्या दिवशी एकूण 98 ओव्हर्सचा खेळ होणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात प्रत्येकी 15 मिनिटं असे एकूण 30 मिनिटं अतिरिक्त खेळ होणार आहे.

अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत (विकेटकीपर) , रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि  मोहम्मद शमी.