किवीचा कर्णधार केन विल्यमसन WTC अंतिम सामना खेळणार की नाही?

केन विल्यमसनला दुखापत झाल्यामुळे इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमधून तो बाहेर पडला होता.

Updated: Jun 15, 2021, 08:24 AM IST
किवीचा कर्णधार केन विल्यमसन WTC अंतिम सामना खेळणार की नाही?  title=

मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनचा अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान होणार आहे. हा सामना ड्युक बॉलनं खेळवला जाणार आहे. खऱाब हवामानाचं सावट या सामन्यावर असणार आहे. त्याच बरोबर आता न्यूझीलंड संघाची धाकधूक वाढली आहे. याचं कारण म्हणजे के विल्यमसन हा अंतिम सामना खेळणार की नाही याबाबत शंका आहे. केन विल्यमसनला इंग्लंड विरुद्ध न्यूझीलडं सामन्यात दुखापत झाली होती. 

इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात दुखापत झाल्यानंतर केन संघाबाहेर गेला होता. दुसऱ्या सामन्यात तो खेळणार नाही अशी माहिती समोर आली होती. मात्र आता WTC 2021 अंतिम सामन्यात तो खेळणार की नाही यावर चर्चा सुरू आहे. इंग्लंड विरुद्ध सीरिजमध्ये केननं मैदान सोडल्यानंतर ज टॉम लॅथमने संघाचं नेतृत्व केलं होतं. केनच्या हेल्थ अपडेटची माहिती दिली आहे. 

लाथॅमनं सांगितलं की केन विल्यमसन रिकव्हर होत आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत तो रिकव्हर होऊ शकतो. त्यामुळे अंतिम सामन्यासाठी केन पुन्हा मैदानात उतरेल अशी आशा त्याने व्यक्त केली आहे. न्य़ूझीलंड संघाने 1999 नंतर पहिल्यांदाच आपल्या घरच्या मैदानात इंग्लंड संघ पराभूत झाला तर न्यूझीलंडने दणदणीत विजय मिळवला आहे. 

लॅथम आणि किवी टीम कोणत्याही एक खेळाडूवर निर्भर नाही हे त्यांनी इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी सीरिजमधून दाखवून दिलं आहे. किवीची टीम इतकी जबरदस्त आहे आणि पूर्ण तयारीनिशी मैदान मारण्यासाठी उतरते हे इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतून समोर आलं आहे. त्यामुळे आता टीम इंडिया कोणता मास्टरप्लॅन आखतं ते पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.