मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड 18 ते 22 जून दरम्यान इंग्लंडमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी किवी संघाची घोषणा करण्यात आली आहे. 15 खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. साउथेप्टम इथे ड्युक बॉलनं हा सामना खेळण्यात येणार असून त्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे केन विल्यमसन आणि डेवोन कॉन्वे खेळणार की नाही. तर याचं उत्तरही आता अगदी स्पष्ट झालं आहे. किवीने आपला संघ जाहीर केला आहे. प्लेइंग इलेव्हन मात्र गुलदस्त्यात असणार आहेत.
केन विलियमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेवोन कॉन्वे, कोलिन डि ग्रँडहोम, मॅट हेनरी, काइल जेमिसन, टॉम लाथम, हेनरी निकोलस, एजाज पटेल, टिम साउदी, रॉस टेलकर, नील वैगनर, बीजे वाटलिंग, विल यंग या खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.
The @BLACKCAPS have named a 15-member squad for the #WTC21 Final pic.twitter.com/g2T4XNCrMW
— ICC (@ICC) June 15, 2021
Ajaz Patel picked as a specialist spinner
Tom Blundell named as the backup wicket-keeperWhat do you make of the @BLACKCAPS squad for the exciting ICC #WTC21 Final?
— ICC (@ICC) June 15, 2021
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सीरिजमध्ये डेवोन कॉन्वे आणि ऐजाज पटेलनं उत्तम कामगिरी केल्यामुळे त्यांना न्यूझीलंड संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. केन विल्यमसन देखील अंतिम सामन्यात खेळणार आहे. डग ब्रेसवेल, जॅकब डफी, डेरिल मिशेल, रचिन रवींद्र आणि मिशेल सेंटनर या खेळाडूंना मात्र WTC 2021च्या अंतिम सामन्यासाठी संधी देण्यात आली नाही.
रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मो. शमी, मो. सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल, ऋद्धिमान साहा