एक ट्विट आणि अमिताभ बच्चन यांना सचिनची माफी मागावी लागली?

या चुकीच्या ट्विटनंतर अमिताभ यांनी तातडीने माफी मागितली आहे.

Updated: Jan 9, 2022, 10:29 AM IST
एक ट्विट आणि अमिताभ बच्चन यांना सचिनची माफी मागावी लागली? title=

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भारतीय क्रिकेट इतिहासातील महान खेळाडू सचिन तेंडुलकरबाबत चुकीच ट्विट केल्यानंतर अमिताभ चर्चेत आलेत. दरम्यान या चुकीच्या ट्विटनंतर अमिताभ यांनी तातडीने माफी मागितली आहे.

अमिताभ यांचं चुकीचं ट्विट

अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडीओ ट्विट केला होता. या व्हिडीयोमध्ये, भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर जगभरातील माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या 'लिजेंड्स लीग क्रिकेट'मध्ये सहभागी झाला होता, असं म्हटलं होतं. मात्र हे सत्य नव्हतं.

'बिग बीं'कडून चुकीची माहिती

यानंतर लगेच एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने शनिवारी स्पष्ट केलं की, सचिन तेंडुलकर येणाऱ्या 'लिजेंड्स लीग क्रिकेट'चा (LLC)  भाग नाही. LLC ही निवृत्त खेळाडूंसाठी एक क्रिकेट लीग आहे. 

या लीगसाठी  भारतीय संघ जाहीर केला आहे. दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या ट्विटनंतर सचिन तेंडुलकरचं काम सांभाळणाऱ्या एसआरटी स्पोर्ट्सच्या  प्रवक्त्याने लीगमधील सचिनचा सहभाग नसल्याचं सांगितलं.

एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रवक्त्याने सांगितलं की, "तेंडुलकर 'लिजेंड्स लीग क्रिकेट'मध्ये सहभागी झाल्याची बातमी खरी नाही. 

अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी

यानंतर तातडीने अमिताभ बच्चन यांनी ट्विट डिलीट करून एक नवा व्हिडिओ पोस्ट केला, "चूक सुधार: लेजेंड्स लीग क्रिकेट टी20' अंतिम प्रोमो. माझ्यामुळे कोणाला त्रास झाला असेल तर मी माफी मागतो आणि खेद व्यक्त करतो. नकळत चूक झाली."

LLC मध्ये तीन टीम असतील ज्या 20 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या लीगमध्ये खेळणार आहेत. भारतीय टीमचं प्रतिनिधित्व युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांच्यासह अन्य खेळाडू करतील. भारताच्या टीमचं नाव 'द इंडिया महाराजा' असं असणार आहे.