मुंबई : श्रीलंकेविरूद्धच्या सिरीजसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. यावेळी बीसीसीआयने टेस्ट टीमच्या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे सोपवली आहे. यामध्ये विकेटकीपर वृद्धीमान साहाला टीममध्ये संधी देण्यात आलेली नाही. यानंतर साहाने कोच राहुल द्रविडवर गंभीर आरोप लावले. अशातच आता एका पत्रकाराने त्याला इंटरव्ह्यूसाठी फार त्रास दिल्याचं समजतंय.
या पत्रकाराच्या मेसेजेसचा स्क्रिनशॉट ट्विटवर पोस्ट करत वृद्धीमान साहाने, भारतीय क्रिकेटमधील माझ्या योगदानाबद्दल पत्रकारांनी माझ्यावर टीका केली त्यानंतर एका तथाकथित आदरणीय पत्रकाराकडून मला या गोष्टीला सामोरं जावं लागतंय. कुठे गेलीये पत्रकारिता! साहाचं टेस्ट टीममध्ये सिलेक्शन झालं नाहीये आणि त्यानंतर त्याने हे ट्विट केलं आहे.
दरम्यान वृद्धीमान साहाच्या या ट्विटवर माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने प्रतिक्रिया दिली आहे. सेहवाग त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, "ही फार दुःखाची गोष्ट आहे. अशा वागण्याने ना पत्रकारांचा गौरव होतोय ना त्यांच्या...ही फक्त चमचेगिरी सुरु आहे. आम्ही तुझ्या सोबत आहोत रिद्धी!"
साहाने शेअर केलेल्या स्क्रिनशॉटमध्ये असं लिहिलंय की, "माझ्या सोबत एक इंटरव्ह्यू करा, त्यांनी केवळ एकाच विकेटकीपरची निवड केली. कोण बेस्ट आहे. तुम्ही 11 जर्नलिस्ट निवडण्याची घोषणा केली, जे माझ्या हिशोबाने योग्य नव्हते. तुम्ही मला फोन नाही केलात. मी तुमचा इंटरव्ह्यू कधीच करणार नाही. आणि ही गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवेन."
दरम्यान श्रीलंकेविरूद्धच्या टेस्ट टीममध्ये समाविष्ट न केल्यानंतर साहाने कोच राहुल द्रविडवर गंभीर आरोप केले आहेत. एका वेबसाईटशी बोलताना सहाने दिग्गज खेळाडू आणि कोच राहुल द्रविड यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. सहाच्या म्हणण्यानुसार, कोच राहुल द्रविड यांनी त्याला निवृत्ती घेण्याबाबत सुचवलं होतं.
सहाने सांगितलं की, निवृत्तीचा विचार करण्यामागे राहुल द्रविड यांनी आता त्याचा सिलेक्शनसाठी विचार केला जाणार नसल्याचं कारण सांगितलं.