World Test Championship Final : बांगलादेश विरुद्धच्या कसोटी (Ind vs Ban) मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. सध्या दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच दिवशी बांगलादेशची दाणादाण उडवून दिली. पहिल्याच दिवशी 227 धावांवर संपूर्ण संघ तंबूत पाठवला. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( World Test Championship) अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. या मालिकेत भारताने बांगलादेशला 2-0 ने पराभूत केल्यास वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) मार्ग सुकर होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशला 188 धावांनी पराभूत केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत दुसरं स्थान पटकावलं आहे. दुसरं स्थान पटकावलं असलं तरी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेवर अंतिम फेरीचं गणित अवलंबून असणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तीन सामन्याची कसोटी मालिका असणार आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलिया वरचढ ठरलं तर भारताची वर्णी अंतिम फेरीत लागेल.
India
South AfricaThe race for the #WTC23 top two spots is well and truly
More https://t.co/cytRDS3RIE pic.twitter.com/0mQvy8lqeI
— ICC (@ICC) December 18, 2022
बातमी वाचा- Ban vs Ind, 2nd Test : अश्विन-उमेशची भेदक गोलंदाजी, बांगलादेशच्या चारी मुंड्या चीत