World Cup: शेवटच्या क्षणी वर्ल्डकपच्या टीममध्ये 2 मोठे बदल; 'या' खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता!

ODI World Cup Squad Change : येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपचा रणसंग्राम रंगणार आहे. यंदाचा वनडे वर्ल्डकप (World Cup 2023) हा भारतात खेळवला जाणार असून चाहते फार उत्सुक आहेत. वर्ल्ड कप (World Cup 2023) सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच टीममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. 

सुरभि जगदीश | Updated: Sep 29, 2023, 07:09 AM IST
World Cup: शेवटच्या क्षणी वर्ल्डकपच्या टीममध्ये 2 मोठे बदल; 'या' खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता! title=

ODI World Cup Squad Change : येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपचा रणसंग्राम रंगणार आहे. यंदाचा वनडे वर्ल्डकप (World Cup 2023) हा भारतात खेळवला जाणार असून चाहते फार उत्सुक आहेत. या स्पर्धेसाठी आयसीसीकडून मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. अशातच वर्ल्ड कप (World Cup 2023) सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच टीममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. यावेळी शेवटच्या क्षणाला 2 देशांनी टीममध्ये बदल केले आहेत. 

ऑस्ट्रेलिया टीमने केले टीममध्ये बदल

वर्ल्डकपसाठी (World Cup 2023) ऑस्ट्रेलियाच्या टीमचा खेळाडू अॅश्टन अगर (Ashton Agar) जखमी झाला. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या टीमने त्याच्या जागी टीममध्ये दुसऱ्या खेळाडूची घोषणा केलीये. अगरच्या जागी आता ऑस्ट्रेलियाच्या 15 सदस्यीय टीममध्ये मार्नस लॅबुशेनचा (Marnus Labuschagne) समावेश करण्यात आला आहे. तर दुसरीकडे दुखापत असूनही ट्रॅव्हिस हेडने आपलं स्थान कायम ठेवलंय. तो वर्ल्डकपच्या मध्यावर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

6 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या टीममध्ये अॅश्टन अगरची (Ashton Agar) दोन आघाडीच्या फिरकी गोलंदाजांपैकी एक म्हणून निवड करण्यात आली होती. यानंतर त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्याला दुखापत झाली. यानंतर त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी तो मायदेशी परतला. 

टीम इंडियामध्ये केला मोठा बदल

यावेळी अखेरच्या क्षणी टीम इंडियामध्येही बदल करण्यात आलेत. यावेळी अक्षर पटेलच्या जागी 37 वर्षीय रविचंद्रन अश्विनची निवड करण्यात आलीये. 15 सप्टेंबर रोजी बांगलादेशविरुद्धच्या आशिया कप-2023 सामन्यात अक्षर जखमी झाला होता. त्यामुळे आता दुखापतीमुळे अक्षरला वर्ल्डकपला मुकावं लागणार आहे.

टीम इंडिया खेळणार 2 सराव सामने

वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडिया प्रॅक्टिस मॅच खेळणार आहे. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) रंगणार आहे. त्याआधी टीम इंडियाला दोन सराव सामने खेळायचे आहेत. यातला पहिला सराव सामना 30 सप्टेंबरला इंग्लंडविरुद्ध खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी आर अश्विनसह संपूर्ण भारतीय संघ गुवाहाटीत दाखल झाला आहे. भारताचा दुसरा सराव सामना तीन ऑक्टोबरला नेदरलँडविरुद्ध होणार आहे. 

वर्ल्डकपसाठी भारताचा अंतिम संघ

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार) , श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकुर.