Video : अनुष्काला पाहण्यासाठी विराटची धडपड; IND vs NZ सामन्यादरम्यान कॅमेऱ्यानं टिपला 'तो' क्षण

World Cup 2023 IND Vs NZ Highlights : तिचं असणंच त्याच्यासाठी खूप काही सांगून गेलं... क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळाली विरुष्काच्या नात्याची सुरेख बाजू   

सायली पाटील | Updated: Nov 16, 2023, 11:29 AM IST
Video : अनुष्काला पाहण्यासाठी विराटची धडपड; IND vs NZ सामन्यादरम्यान कॅमेऱ्यानं टिपला 'तो' क्षण  title=
World Cup Ind Vs Nz Virat Kohli struggles to see wife Anuskha sharma video goes viral

World Cup 2023 IND Vs NZ Highlights : यंदाच्या वर्ल्ड कपचा अंतिम सामना आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, भारतीय क्रिकेट संघानं न्यूझीलंडच्या संघावर मात करत दमदार विजय मिळवला. संघाच्या वाट्याला आलेला हा विजय अतिशय खास ठरला. मुंबईतील (Mumbai News) वानखेडे स्टेडियमवर Team India चा हा सामना खेळवण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील दिग्गजांनी सामन्यासाठी हजेली लावली होती. अशा या सामन्यामध्ये भारतीय संघानं दमदार कामगिरी केलीच पण, दोन्ही संघांच्या खेळाव्यतिरिक्त आणखी एका गोष्टीन सर्वांच्याच मनाचा ठाव घेतला. ती म्हणजे विराट आणि अनुष्काची Cute Chemistry. 

न्यूझीलंडविरोधातील सामन्यामध्ये विराट कोहलीनं एकदिवसीय सामन्यांमध्ये 50 शतकांचा टप्पा गाठत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. ज्यानंतर त्यानं मैदनात असणाऱ्या क्रिकेटप्रेमींचे आभार मानण्यासोबतच सामना पाहण्यासाठी आलेल्या सचिन तेंडुलकरलाही अभिवादन केलं. विराटचं हे यश पाहण्यासाठी त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मासुद्धा तिथं पोहोचली होती. 

विराटनं मिळवलेल्या यशानंतर तिनंही टाळ्या वाजवत आणि Flying Kisses देत त्याचं अभिनंदन केलं. वानखेडेवर खेळवण्यात आलेल्या सामन्यानंतर विराट आणि अनुष्का या दोघांचेही अनेक व्हिडीओ पाहायला मिळाले. जिथं या जोडीची सुरेख केमिस्ट्री नजरा खिळवणारी होती. याच व्हिडीओंमध्ये एक Video असा होता जिथं विराट अनुष्काची एक झलक पाहण्यासाठी धडपड करताना दिसला. 

एखाद्या लहान मुलाला एखादी गोष्ट दिसणं अपेक्षित असते आणि ती गोष्ट त्याच्या नजरेत येत नाही त्यामुळं तो जसा व्याकुळ होतो, जीवाचा आटापिटा करतो अगदी तसंच काहीसं विराट करताना दिसला. अनुष्का आणि विराट हे दोघंही एकाच बाजूच्या स्टँडमध्ये बसले होते. जिथं खाली ड्रेसिंग रुम आणि वर प्रेक्षक गॅलरी होती. भारताची धावसंख्या 2 बाद 347 इतकी असतानाच विराट ड्रेसिंग रुमच्या रेलिंगपाशी आला आणि त्यानं वरच्या दिशेनं पाहण्यास सुरुवात केली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

 

हेसुद्धा वाचा : Kane Williamson: ...'हे' फार निराशाजनक; सेमीफायनलच्या पराभवानंतर भावूक झाला केन विलियम्सन

वर पहिल्याच रांगेत बसलेल्या अनुष्कालाच तो पाहत असावा असा कयास नेटकऱ्यांनी लावला आणि त्याचा हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाला. विराट अनुष्काला शोधण्यासाठी हे जे कारी करतोय ते फारच गोड आहे... असंच म्हणत चाहते आणि क्रिकेटप्रेमींनी या व्हिडीओवर Like रिअॅक्शन दिले.