Video : नेदरलँडच्या खेळाडूला पाहताच भारतीयाने सुरु केला मंत्रोच्चार; कारण आले समोर

World Cup 2023:  विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी विविध संघ भारतात येत आहेत. गुरुवारी नेदरलँडचा संघ देखील बंगळुरु विमानतळावर दाखल झाला होता. यावेळी भारतीय पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आलं. मात्र यावेळी एका भारतीयाने केलेल्या कृत्याची सगळीकडे चर्चा आहे.

आकाश नेटके | Updated: Sep 29, 2023, 04:45 PM IST
Video : नेदरलँडच्या खेळाडूला पाहताच भारतीयाने सुरु केला मंत्रोच्चार; कारण आले समोर title=

World Cup 2023: भारतात 5 ऑक्टोबरपासून क्रिकेट विश्वचषक स्पर्धा (World Cup) होणार आहे. स्पर्धेची मेगा फायनल 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावेळी भारतासह (India) 10 देशांचे संघ 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी होत आहेत. 2011 नंतर भारत विश्वचषकाचे आयोजन करत आहे. दरम्यान, यावेळी नेदरलँडचा (Netherland) संघही या विश्वचषकात खेळण्यासाठी भारतात आला आहे. यापूर्वी 2011 साली नेदरलँड विश्वचषक खेळण्यासाठी भारतात आला होता. मात्र यावेळी भारतात आलेल्या संघासोबत भलताच प्रकार घडला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.

नेदरलँडचा संघ बंगळुरूला पोहोचल्यावर त्याचे जंगी स्वागत झाले. नेदरलँडच्या संघाने त्यांच्या स्वागताचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र विमानतळावर नेदरलँड संघाच्या एका खेळाडूला पाहून एका भारतीय व्यक्तीने मंत्रपठण सुरू केले आणि संघाच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या. या घटनेचा व्हिडीओ कोणीतरी काढला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. त्यानंतर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा तुफान व्हायरल झाला आहे.

5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आगामी विश्वचषक 2023 साठी एकामागून एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ भारतात पोहोचत आहेत. बुधवारी रात्री पाकिस्तान संघ हैदराबादमध्ये उतरला तर अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचा संघही भारतात आला आहे. नेदरलँडचा संघही गुरुवारी भारतात पोहोचला असून बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे विमान उतरलं. यावेळी भारतीय चाहते आपापल्या परीने या खेळाडूंचे स्वागत करत आहेत. काही जण पाकिस्तान क्रिकेटर्सचा जयजयकार करताना दिसले होते. भगवं उपरणं घालून त्यांचे स्वागत करण्यात आलं.

नेदरलँडचा संघ भारतात आल्यानंतर त्यांच्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक भारतीय व्यक्ती नेदरलँड क्रिकेट संघासाठी विशेष प्रार्थना करत असल्याचे दिसत आहे. विश्वचषकाची तयारी सुरू करण्यासाठी हा संघ लवकर भारतात आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, एक माणूस ॐ ऐं ह्रीं क्लीं मंत्रांचा जप करताना दिसत आहे. त्यावेळी नेदरलँडचा खेळाडू विमानतळावर त्या माणसाच्या विनंतीनुसार डोळे बंद करुन उभा असल्याचे दिसत आहे.

नेदरलँड्सचा संघ -

स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ'डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामनुरु, पॉल व्हॅन मीकरेन, कॉलिन एकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद, सायब्रँड एंजेलब्रेक्ट.