'भारतीय चाहत्यांना शांत करण्यात वेगळीच मजा आहे'; पॅट कमिन्सचे फायनलआधीच मोठं विधान

World Cup 2023 Final AUS vs IND :  एकदिवसीय वर्ल्डकप 2023 च्या अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने पत्रकार परिषदेत भारतीय चाहत्यांबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.

Updated: Nov 18, 2023, 04:34 PM IST
'भारतीय चाहत्यांना शांत करण्यात वेगळीच मजा आहे'; पॅट कमिन्सचे फायनलआधीच मोठं विधान title=

World Cup 2023 Final AUS vs IND : वर्ल्डकप 2023 च्या (World Cup 2023) अंतिम सामन्याकडे सगळ्या जगातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलं आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (narendra modi stadium)  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचा (AUS vs IND) थरार रंगणार आहे. दोन्ही संघातील खेळाडूंकडून या सामन्यासाठी कसून तयारी सुरु आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंनी भारतीय संघाला तगडं आव्हान देण्यास असल्याचं म्हटलं आहे. यासोबत एका ऑस्ट्रेलियन खेळाडूने भारतीय चाहत्यांबद्दलही एक धक्कादायक विधान केले आहे.

पाचवेळच्या वर्ल्डकप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियासमोर यंदा स्पर्धेचे यजमानपद असलेल्या भारतीय संघाचे आव्हान असणार आहे. भारताने आतापर्यंत दोनदा वर्ल्डकप जिंकला असून रविवारी तिसऱ्यांदा चॅम्पियन्स होण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. घरच्या मैदानावर हा सामना असल्याने भारतीय संघाला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने भारतीय चाहत्यांबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. 

कर्णधार पॅट कमिन्स अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारतीय संघाला पराभूत करण्यास उत्सुक आहे. भारतीय संघाला प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा असेल, पण आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ खेळण्याचा प्रयत्न करू असे  पॅट कमिन्सने म्हटलं आहे. 'रविवारी 1,30,000 प्रेक्षकांसमोर खेळणे हा वेगळा अनुभव असेल. बहुसंख्य चाहते टीम इंडियाच्या बाजूने जल्लोष करतील पण त्यांना शांत करण्यात वेगळीच मजा आहे", असे कमिन्सने भारतीय चाहत्यांबद्दल म्हटलं आहे. रविवारी भारतीय चाहत्यांनी मैदान भरेल यात शंका नाही, पण जे काही असेल त्याचा सामना करायला हवा. आम्हाला चांगला खेळ करून दिवस संपवायचा आहे, असेही कमिन्स म्हणाला.

फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला सर्वात मोठा धोका मोहम्मद शमीकडून

रोहित शर्मा आणि विराट कोहलीला आऊट करण्यासाठी त्याची खास योजना आहे. मात्र, शमीपासून दूर राहावे लागणार असल्याचे त्याने कबूल केले. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला सर्वात मोठा धोका मोहम्मद शमीपासून आहे, जो खूप चांगला खेळत आहे. त्याची गोलंदाजीही चांगली आहे, असे पॅट कमिन्स म्हणाला.

अहमदाबादच्या खेळपट्टीबद्दल काय बोलला पॅट कमिन्स?

"खेळपट्टी खूपच चांगली दिसते, ती याआधीही स्पर्धेत वापरली गेली आहे. मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांना अंतिम फेरीत चांगली कामगिरी करायची आहे. दोन्ही संघांसाठी पिच सारखाच असणार आहे. आपल्या देशात, आपल्याच विकेटवर खेळण्याचे फायदे आहेत यात शंका नाही, पण आपण इथे भरपूर क्रिकेट खेळतो, त्यामुळे फारसा फरक पडत नाही," असेही कमिन्स म्हणाला.