World Cup 2019 : विराट कोहलीचा विक्रम, सगळ्यात जलद ११ हजार रन पूर्ण

पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने विक्रमाला गवसणी घातली आहे.

Updated: Jun 16, 2019, 06:51 PM IST
World Cup 2019 : विराट कोहलीचा विक्रम, सगळ्यात जलद ११ हजार रन पूर्ण title=

मॅनचेस्टर : पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने विक्रमाला गवसणी घातली आहे. विराटने वनडे क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद ११ हजार रनचा टप्पा ओलांडला आहे. पाकिस्तानविरुद्ध ५७वी रन काढल्यानंतर विराटने हे रेकॉर्ड केलं. आपली २३०वी मॅच खेळणाऱ्या विराटने ११ हजार रनचा टप्पा ओलांडला. वनडे क्रिकेटमध्ये ११ हजार रन करणारा विराट हा तिसरा भारतीय आहे.

सचिन तेंडुलकरने २७६ इनिंगमध्ये ११ हजार रन पूर्ण केले. सचिनने त्याच्या कारकिर्दीत ४६३ मॅचमध्ये १८,४२६ रन केले. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगने २८६ इनिंगमध्ये ११ हजार रन आणि सौरव गांगुलीने २८८ इनिंगमध्ये ११ हजार रन पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसला ११ हजार रन करण्यासाठी २९३ इनिंग लागल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११ हजार रनचा टप्पा ओलांडणारा विराट हा नववा खेळाडू आहे.

वनडे क्रिकेटमध्ये विराटचा सर्वाधिक स्कोअर १८३ रन आहे. १८ मार्च २००२ ला ढाक्यामध्ये पाकिस्तानविरुद्ध विराटने ही खेळी केली होती. विराटने ७७ टेस्टच्या १३१ इनिंगमध्ये ६,६१३ रन केले आहेत.