World Cup 2019 : वर्ल्ड कपमध्येच टीम इंडियासाठी खुशखबर, वनडे क्रमवारीत अव्वल

टीम इंडिया आणि त्यांच्या चाहत्यांसाठी वर्ल्ड कपमध्येच आनंदाची बातमी आली आहे.

Updated: Jun 27, 2019, 08:30 PM IST
World Cup 2019 : वर्ल्ड कपमध्येच टीम इंडियासाठी खुशखबर, वनडे क्रमवारीत अव्वल title=

दुबई : टीम इंडिया आणि त्यांच्या चाहत्यांसाठी वर्ल्ड कपमध्येच आनंदाची बातमी आली आहे. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार वनडे क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे. आयसीसीने याबबातचे ट्वीट करुन माहिती दिली आहे.

याआधी आयसीसीच्या टीम क्रमवारीत इंग्लंड टीम पहिल्या क्रमांकावर होती. पण वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा ३ मॅचमध्ये पराभव झाला. इंग्लंडला पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाने पराभवाची धूळ चारली. त्यामुळे क्रमवारीत इंग्लंडचे पॉईंट्स कमी झाले. तर टीम इंडियाने आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये एकही मॅच गमावलेली नाही. त्यामुळे टीम इंडियाचा फायदा झाली.

टीम इंडिया ताज्या आकडवारीनुसार १२३ पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तर इंग्लंड १२२ पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर गेली आहे. यानंतर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या टीम विराजमान आहेत.