World Cup 2019 : वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये 'हिटमॅन'चा विक्रम, रोहित सचिनच्या पंगतीत

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आलं. 

Updated: Jul 14, 2019, 10:34 PM IST
World Cup 2019 : वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये 'हिटमॅन'चा विक्रम, रोहित सचिनच्या पंगतीत title=

लंडन : वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आलं. पण तरीही भारताचा हिटमॅन रोहित शर्मा या वर्ल्ड कपमधला सर्वाधिक रन करणारा खेळाडू ठरला. वर्ल्ड कपच्या फायनलआधी इंग्लंडचा जो रूट आणि न्यूझीलंडचा केन विलियमसन यांना रोहितचा विक्रम मोडण्याची संधी होती, पण दोघंही या मॅचमध्ये स्वस्तात आऊट झाले. 

रोहित शर्माचा सर्वाधिक रन करण्याचा विक्रम मोडण्याची संधी याआधी डेव्हिड वॉर्नरला होती. पण सेमी फायनलमध्ये डेव्हिड वॉर्नरची ही संधी अवघ्या १ रनने हुकली. यानंतर रोहितच्या सर्वाधिक रनचा विक्रम मोडीत काढण्याची संधी जो रुट याला होती. पण न्यूझीलंड विरुद्धच्या अंतिम सामन्यात जो रुट हा ७ रन करुन बाद झाला. त्यामुळे रोहित शर्मा यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन करणारा खेळाडू ठरला आहे.         

रोहित शर्माने वर्ल्ड कपमध्ये एकूण ९ सामने खेळला. या ९ सामन्यात त्याने ५ शतकांच्या मदतीने ६४८ रन केले. या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नरने १० मॅचमध्ये ६४७ रन केल्या. त्यामुळे वॉर्नरची रोहितचा विक्रम मोडण्याची संधी फक्त २ रननी हुकली.

वर्ल्ड कपच्या फायनलआधी रोहितचा विक्रम मोडण्यासाठी रूटला १०० रनची आणि केन विलियमसनला १०१ रनची गरज होती. पण फायनलमध्ये केन विलियमसन ३० रनवर आणि जो रूट ७ रनवर आऊट झाला. त्यामुळे केन विलियमसनने १० मॅचच्या ९ इनिंगमध्ये ५७८ रन आणि जो रूटने ११ मॅचच्या ११ इनिंगमध्ये ५५६ रन केले. ८ मॅचमध्ये ६०६ रन करणारा बांगलादेशचा शाकिब अल हसन या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. २००३ वर्ल्ड कपमध्ये सचिनने ६७३ रन केले होते. १६ वर्षानंतरही सचिनचा हा विक्रम अबाधित आहे.