World Cup 2019 : सेमी फायनल इंग्लंड-ऑस्ट्रेलियाची, पण विक्रम मात्र रोहितचा

ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारत इंग्लंडने क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडाक्यात प्रवेश केला आहे.

Updated: Jul 11, 2019, 11:29 PM IST
World Cup 2019 : सेमी फायनल इंग्लंड-ऑस्ट्रेलियाची, पण विक्रम मात्र रोहितचा title=

बर्मिंघम : ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारत इंग्लंडने क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडाक्यात प्रवेश केला आहे. कांगारुंनी ठेवलेल्या २२४ रनच्या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडने अगदी सहज केला. ऑस्ट्रेलियाचं हे आव्हान इंग्लंडने ८ विकेट राखून ३२.१ ओव्हरमध्येच पूर्ण केलं. आता १४ जुलैला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड कपची फायनल खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या या मॅचमध्ये भारताच्या रोहित शर्माचं रेकॉर्ड धोक्यात होतं. पण रोहितचं हे रेकॉर्ड फक्त २ रननी शाबूत राहिलं आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने तब्बल ६४८ रन केल्या आहेत. फक्त ९ इनिंगमध्ये रोहितने ही धमाकेदार कामगिरी केली. याचबरोबर रोहितने एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक ५ शतकं करण्याचा विक्रमही केला. याआधी हा विक्रम श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर होता. संगकाराने २०१५ वर्ल्ड कपमध्ये ४ शतकं केली होती.

इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर रोहितचा हा विक्रम मोडण्याच्या जवळ आला होता, पण वॉर्नर फक्त २ रननी मागे राहिला. वॉर्नरने या वर्ल्ड कपच्या १० इनिंगमध्ये ६४७ रन केले. इंग्लंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये वॉर्नर ११ बॉलमध्ये ९ रन करुन आऊट झाला. ऑस्ट्रेलियाची टीम वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्यामुळे आता वॉर्नरला रोहितचं हे रेकॉर्ड मोडता येणार नाही.

रुट-विलियमसनला संधी

वॉर्नरला रोहितचं हे रेकॉर्ड मोडता येणार नसलं तरी इंग्लंडचा जो रुट आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनला हा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. फायनलमध्ये हे दोन्ही खेळाडू खेळताना दिसतील. जो रुटने या वर्ल्ड कपमध्ये ५४९ रन आणि केन विलियमसनने ५४८ रन केले आहेत. म्हणजेच रोहितचा विक्रम मोडण्यासाठी रुटला १०० रनची आणि केन विलियमसनला १०१ रनची गरज आहे.

विक्रम सचिनच्याच नावावर

एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने २००३ वर्ल्ड कपमध्ये ६७३ रन केले होते. सचिनचा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्माला २६ रन कमी पडल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये रोहित १ रन करून आऊट झाला.

सचिनचा सर्वाधिक रनचा विक्रम मोडण्यासाठी जो रुटला १२५ रन आणि केन विलियमसनला १२६ रनची गरज आहे.