World Cup 2019 : महिलांसोबत फोटो काढल्यामुळे रवी शास्त्री ट्रोल

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचआधी टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना ट्रोल करण्यात आलं.

Updated: Jun 5, 2019, 05:45 PM IST
World Cup 2019 : महिलांसोबत फोटो काढल्यामुळे रवी शास्त्री ट्रोल title=

साऊथम्पटन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचआधी टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना ट्रोल करण्यात आलं. रवी शास्त्री यांनी दोन महिलांसोबत काढलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. रवी शास्त्रींसोबत या फोटोमध्ये दोन महिला आणि एक पुरुषही आहे. भारतातल्याच नाही तर परदेशातल्या क्रिकेटप्रेमींनीही या फोटोवरून रवी शास्त्रींवर निशाणा साधला.

Ravi Shastri 30

मूळचा ऑस्ट्रेलियाचा असलेला आणि पाकिस्तानी टीमचा समर्थक असलेला डेनिस फ्रीडमन म्हणाला, 'टीम इंडियाची वर्ल्ड कपची तयारी योग्य पद्धतीने सुरू आहे, असं वाटतंय.'

'फाईन लेगवर फिल्डिंग, आम्ही मैदानात आणि मैदानाबाहेरही खेळतो, मुलींनो तुम्हाला रवी शास्त्री कोण आहे ते माहिती नाही का?, रवी शास्त्री शेन वॉर्नपेक्षा चांगला आहे. असंच करत राहा, तुम्ही खूप चांगलं करत आहात. वर्ल्ड कपआधी रवी शास्त्री सराव करत आहेत,' अशावेगवेगळ्या प्रतिक्रिया रवी शास्त्रींच्या या फोटोवर देण्यात आल्या.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचआधी मीडिया आणि टीम प्रशासनामध्ये वाद पाहायला मिळाला. पत्रकार परिषदेला टीममध्ये नसलेले आवेश खान आणि दीपक चहर आल्यामुळे मीडियाने या पत्रकार परिषदेवर बहिष्कार घातला. दीपक चहर आणि आवेश खान हे फास्ट बॉलर टीम इंडियाच्या बॅट्समनना नेटमध्ये सराव देण्यासाठी इंग्लंडमध्ये गेले आहेत.