World Cup 2019 : वर्ल्ड कपची फायनलची सुपर ओव्हरही टाय, पण इंग्लंडचा विजय

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातली वर्ल्ड कप फायनल टाय झाली आहे. 

Updated: Jul 15, 2019, 12:34 AM IST
World Cup 2019 : वर्ल्ड कपची फायनलची सुपर ओव्हरही टाय, पण इंग्लंडचा विजय title=

लंडन : 

वर्ल्ड कपची फायनलची सुपर ओव्हरही टाय, पण इंग्लंडचा विजय, न्यूझीलंडपेक्षा जास्त बाऊंड्री मारल्यामुळे इंग्लंडचा विजय

वर्ल्ड कपची फायनल सुपर ओव्हरमध्ये, न्यूझीलंडला विजयासाठी १६ रनची गरज 

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातली वर्ल्ड कप फायनल टाय झाली आहे. यामुळे आता सुपर ओव्हर होणार आहे. न्यूझीलंडने ठेवलेल्या २४२ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा २४१ रनवर ऑल आऊट झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये इंग्लंडला विजयासाठी १५ रनची गरज होती. शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या दोन बॉलला बेन स्टोक्सला एकही रन काढता आली नाही. यानंतर स्टोक्सनं ट्रेन्ट बोल्टच्या तिसऱ्या बॉलला सिक्स मारली. चौथ्या बॉलला दोन रन काढल्यानंतर मार्टिन गप्टीलने केलेला थ्रो स्टोक्सला लागून बॉल फोरला गेला. यामुळे इंग्लंडला ६ रन मिळाल्या. पाचव्या बॉलला दुसरी रन काढताना आदिल रशीद रन आऊट झाला. यानंतर शेवटच्या बॉलवर इंग्लंडला विजयासाठी २ रनची गरज होती. तेव्हा दुसरी रन काढताना मार्क वूडही रन आऊट झाला.